मुंबई-
शिवसेनेच्या बाबतीत खरंतर त्यांनी जेवढा वेळ मागितला तेवढा वेळ निवडणूक आयोगानं दिला होता. आधी दोन आठवडे मागितले, मग चार आठवडे मागितले. निवडणूक आयोगानं हवा तितका वेळ दिला. पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही. स्वायत्त संस्थांवर आरोप करुन त्यांना कमकुवत करण्याचं काम यांच्याकडून सुरू आहे, असा घणाघाती आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
औरंगाबाद, जालना राज्याच्या औद्योगिक विकासाचे भविष्य; गुंतवणुकदारही सकारात्मक: देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी इन्व्हेस्टर राउंड टेबल कार्यक्रमाचे मंत्री पियुष गोयल यांच्या पुढाकाराने आज मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना हायकोर्टात जाणार असल्याच्या मुद्द्यावर बोलातना फडणवीसांनी शिवसेना आणि काँग्रेसवर हल्ला चढवला.
शिवसेनेचं नवीन चिन्ह क्रांती घडवून आणेल, ही काही पहिलीच वेळ नाही; तुरुंगातून संजय राऊतांचा एल्गार!
"शिवसेनेनं जेवढा वेळ मागितला तेवढा वेळ निवडणूक आयोगानं दिला. पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही. कायद्याला सामोरं जावंच लागतं. आता निवडणूक आयोगानं अंतरिम आदेश दिला आहे. कोणताही अंतिम आदेश दिलेला नाही. ज्यावेळी एखादं प्रकरण कमकुवत असेल तेव्हा देशाच्या स्वायत्त संस्थांवर हल्ला करायचा. ही शिवसेना आणि काँग्रेसची पद्धत झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या बाजूनं निर्णय दिला तर उत्तम आणि नाही दिला तर त्यांच्या विरोधात बोलायचं. ही जी काही पद्धत आहे ती संस्थांना कमकुवत करण्याचं काम चाललं आहे", असं फडणवीस म्हणाले.
निवडणूक आयोगानं योग्यच निर्णय दिला"निवडणूक आयोगानं कालचा जो निर्णय दिला तो पाहता गेल्या २५ वर्षात देशातील कोणत्याही राज्यात आणि कोणत्याही पक्षात जेव्हा उभी फूट पडली आहे. त्यावेळी निवडणूक आयोगानं समान निर्णय दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं जे काही रडगाणं सुरू आहे ते राजकीय रडगाणं आहे", असं फडणवीस म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"