Devendra Fadnavis : 'आपण सारे मिळून जनतेच्या...! राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 09:11 PM2024-04-09T21:11:50+5:302024-04-09T21:12:31+5:30
Devendra Fadnavis Raj Thackeray : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्कमध्ये पाडवा मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला.
Raj Thackeray (Marathi News ) : मंबई-आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्कमध्ये पाडवा मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं स्वागत केले आहे.
"सस्नेह स्वागत ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे, असं ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे.
"आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या!, असंही या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सस्नेह स्वागत !
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 9, 2024
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत,
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी,
भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी,
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत…
भाजपा नेते ॲड. आशिष शेलार यांनीही मानले आभार
हिंदुत्वासाठी आणि विकसित भारतासाठी "मोदींच्या परिवाराला" बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या श्रीमान राज ठाकरे यांचे आभार ! हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे विचारांची तडफदार भूमिका आज महाराष्ट्राने पाहिली ! सकाळी ऐकले ते "नकली" आणि संध्याकाळी महाराष्ट्राने पाहिले ते "असली"!, असं ट्विट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलं आहे.
हिंदुत्वासाठी आणि विकसित भारतासाठी
"मोदींच्या परिवाराला" बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या श्रीमान राज ठाकरे यांचे आभार !
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे विचारांची तडफदार भूमिका आज महाराष्ट्राने पाहिली !
सकाळी ऐकले ते "नकली" आणि संध्याकाळी महाराष्ट्राने पाहिले ते…— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) April 9, 2024
राज ठाकरेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
"अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं योग्य वेळी सर्व मांडेन. माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, करावीच लागेल लपवून ठेवणारा नेता मी नाही. काय तर म्हणे राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार, "अरे व्हायचं असतं तर २००६ सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. पण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
"तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका. मी जे अपत्य जन्माला घातलं आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना'तेच मी वाढवणार.मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत, असं सांगत राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांना ठाकरे यांनी पूर्णविराम दिला.