"देवेंद्र फडणवीस हेच कुशल नेतृत्व, जे मराठा आरक्षण मिळवून देऊ शकतात"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 03:10 PM2023-11-26T15:10:03+5:302023-11-26T15:28:00+5:30

मराठा आरक्षण हा राज्यातील प्रमुख मुद्दा बनला आहे. 

"Devendra Fadnavis is the skilled leadership who can really bring Maratha reservation", Narendra Maharaj on reservation | "देवेंद्र फडणवीस हेच कुशल नेतृत्व, जे मराठा आरक्षण मिळवून देऊ शकतात"

"देवेंद्र फडणवीस हेच कुशल नेतृत्व, जे मराठा आरक्षण मिळवून देऊ शकतात"

मुंबई/लातूर - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तणावाचा झाला असून सरकारने मनोज जरांगे पाटील यांना २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असा विश्वास सरकारने दिला आहे. त्यामुळे, जरांगे यांच्यासह मराठा समाजाला आता २४ डिसेंबरची ओढ लागली आहे. मात्र, तत्पूर्वी राज्यात मराठा आणि ओबीसी वाद पेटल्याचं दिसून येत आहे. एककीडे मनोज जरांगे पाटील यांच्या सभा आणि रॅली होत आहेत. तर, दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या महाएल्गार सभेचं आयोजन केलं जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षण हा राज्यातील प्रमुख मुद्दा बनला आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता नरेंद्र महाराज यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. लातूरमधील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीसांना होत असलेला विरोध योग्य नसल्याचे म्हटले. ''देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र, त्यांच्यानंतर आलेल्या सरकारने ते आरक्षण घालवलं. वास्तविक या मंडळींनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठिशी असलं पाहिजे, कारण, जे आरक्षण तुम्ही आम्हाला मिळवून दिलं होतं, ते आरक्षण पुन्हा मिळेल कसं, अजून टीकेल कसं, असा प्रयत्न झाला पाहिजे, असे म्हणत नरेंद्र महाराजांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. 

ज्यांनी आरक्षण मिळवून दिलं, त्यांनाच समाजात विरोध होतोय हे उलटचित्र दिसतय. पण, देवेंद्र फडणवीस हेच कुशल नेतृत्व आहे, जे खऱ्या अर्थाने आरक्षण मिळवून देऊ शकतात, असेही नरेंद्र महाराज यांनी म्हटले. 

भुजबळांचा जरांगेंवर निशाणा

दरम्यान, ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हिंगोलीत आज ओबीसी नेत्यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला निघालेल्या छगन भुजबळ यांच्या ताफ्याला काही ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले. मात्र कोणत्याही परिस्थितीत आपण हिंगोलीतील सभेला जाणार असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार, ते हिंगोलीत पोहोचले, येथील व्यासपीठावरुन त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. तसेच, मराठा समाजाला देण्यात येत असलेल्या कुणबी प्रमाणपत्रास विरोध दर्शवला. मराठा समाजाला ओबीसीतून देत असलेल्या आरक्षणासा विरोध असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: "Devendra Fadnavis is the skilled leadership who can really bring Maratha reservation", Narendra Maharaj on reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.