'देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच इथं बसून बिहारची सुत्रं हलवली असतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 05:34 PM2020-11-10T17:34:47+5:302020-11-10T17:35:28+5:30

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने प्रभारी म्हणून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. फडणवीस यांनी बिहार निवडणुकांसाठी रणनिती आखत प्रचारही केला.

'Devendra Fadnavis must have moved the slogans of Bihar by sitting here', sanjay raut | 'देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच इथं बसून बिहारची सुत्रं हलवली असतील'

'देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच इथं बसून बिहारची सुत्रं हलवली असतील'

Next
ठळक मुद्देबिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने प्रभारी म्हणून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. फडणवीस यांनी बिहार निवडणुकांसाठी रणनिती आखत प्रचारही केला.

मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे. राज्यातील मजमोजणीकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. एनडीए की महागठबंधंन यांच्यात कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, भाजपाप्रणित एनडीएने आघाडी घेत विजय त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील भाजपा नेत्यांकडून विजयाचे श्रेय विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येत आहे. तर, आता खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन केले आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने प्रभारी म्हणून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. फडणवीस यांनी बिहार निवडणुकांसाठी रणनिती आखत प्रचारही केला. मात्र, निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात फडणवीस यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते मुंबईत परतले होते. मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांनी उपचार घेऊन कोरोनावर मात दिली. दरम्यानच्या, काळात निवडणूक प्रचाराची सांगता झाली. मात्र, फडणवीस यांनी आपली जबाबदारी निभावली होती. फडणवीस यांच्या रणनितीचं आणि नेतृत्वाच हे यश असल्याचं भाजपाचे नेते आणि माजी आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय. त्यानंतर, आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीह देवेंद्र फडणवीसांनी अनुभावाच्या जोरावर बिहारमध्ये सुत्र हलवली असे म्हटलं आहे. 

''जे जिंकले त्यांचं अभिनंदन करण्याची आमची परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून बिहारचे प्रमुख होते, त्यांना महाराष्ट्राचा अनुभव दांगडा आहे. फडणवीसांनी नक्कीच इथं बसून बिहारमध्ये सुत्रं हलवली असतील, संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथं कामाला लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तेथे 17 ते 18 सभा घेतल्या आहेत,'' असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीसाचं कौतुक केलंय. पण, इथ बसून असे म्हणत टोलाही लगावला आहे.   

नितीशकुमारांनी शिवसेनेचे आभार मानावे. 

शब्द पाळला नाही, तर काय होतं याचा अनुभव भाजपनं महाराष्ट्रात घेतलेला आहे. त्यामुळेच आता बिहारमध्ये भाजपनं सावध भूमिका घेतल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. 'भाजपनं शिवसेनेलाही मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. जागा कमी जास्त आल्या तरीही मुख्यमंत्रिपद देऊ असं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र, ते आश्वासन पाळलं गेलं नाही. त्यामुळे शिवसेनेनं पलटवार केला. त्यामुळेच आता भाजप आपल्या मित्रपक्षांना दिलेला शब्द पाळत आहे. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानायला हवेत,' असं राऊत यांनी म्हटलं.

प्रसाद लाड म्हणाले

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा धुव्वा उडाल्याचं चित्र एक्झिट पोलमध्ये दाखवलं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात वातावरण असल्याचं दाखवलं. मात्र, बिहारमधील जनतेने भाजपवर, पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला” अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी एका मराठी वृत्त वहिनीला दिलेली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचंही हे यश आणि विजय आहे. या निवडणुकीत एनडीए 130 च्या वर जाईल आणि महागठबंधन 100 च्या खाली येईल, असा विश्वासही यावेळी प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

Read in English

Web Title: 'Devendra Fadnavis must have moved the slogans of Bihar by sitting here', sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.