Join us

देवेंद्र फडणवीसांना बागेश्वर बाबा महत्त्वाचे वाटले असतील; बच्चू कडूंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 6:57 PM

 गेल्या काही दिवसांपासून बागेश्वरबाबा महाराष्ट्रात आहेत. आधी छत्रपती संभाजीनगर तर आता ते पुण्यात आहेत.

मुंबई-  गेल्या काही दिवसांपासून बागेश्वरबाबा महाराष्ट्रात आहेत. आधी छत्रपती  संभाजीनगर तर आता ते पुण्यात आहेत. आज त्यांची भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. 

माझ्या टप्प्यात आला तर वाजवणारच...; मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर निशाणा

मराठा आरक्षणा संदर्भातही आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार कडू म्हणाले, बागेश्वरबाबा साईबाबा आणि संत तुकारामांच्यावर जास्त बोलत होते पण बागेश्वरबाबांनी आता दर्शन घेतलं यातच सगळ आले आहे. तुकाराम महाराज आणि बागेश्वर बाबांच्यात मोठा फरक आहे. तुकाराम महाराज हे संत आहेत. तर बागेश्वरबाबा हे चमत्कारी बाबा आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर महाराज महत्वाचे वाटले असतील, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. 

"महाराष्ट्र सध्या वेगळ्या वळणावर जात असून साई नगरीत त्यांचाच अपमान करणाऱ्या बागेश्वरबाबा प्रती फडणवीस यांची आस्था अधिक असू शकते हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे, असंही बच्चू कडू म्हणाले. 

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, आरक्षणासाठी दोन समाजात तेढ होऊ नये. राज्यात सर्वजण एकोप्याने राहिले आहेत. आम्ही मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांनच्यात व्यक्तीगत टीका टीप्पणी होऊ नये, असंही बच्चू कडू म्हणाले. 

मराठा आरक्षाबाबत प्रगती अहवाल घेणार

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबाबत झालेल्या आंदोलनात दाखल झालेले गुन्हा मागे घेतलेले नाही. याबाबत आम्ही चर्चा करणार आहे. मराठा आरक्षणा संदर्भात आता पर्यंत काय काय केलं याच्या प्रगतीचा अहवाल घेणार आहे. 

टॅग्स :बच्चू कडूभाजपादेवेंद्र फडणवीसबागेश्वर धाम