Join us

देवेंद्र फडणवीस खोटे व्हिडीओ शेअर करतायेत - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 1:08 PM

'माजी गृहमंत्री आणि विधानसभेच्या जबाबदारी विरोधी पक्षनेत्याने अशी खोटी माहिती शेअर करु नये'

मुंबई : सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन भारतात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. यावरून भाजपाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वादग्रस्त घोषणा देण्यात येत आहेत. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ खोटा असल्याचे सांगत काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील भाजपाची सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस निराश झाले आहेत. सत्य पाहिल्याशिवाय वादग्रस्त व्हिडीओ शेअर करत आहे. त्यांनी आधी व्हिडीओची चौकशी करायला हवी, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे व्हिडीओ शेअर करत आहेत, हे खूप दुखदायक आहे. त्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाने हा व्हिडीओचे सत्य जाणून घेतले पाहिजे. माजी गृहमंत्री आणि विधानसभेच्या जबाबदारी विरोधी पक्षनेत्याने अशी खोटी माहिती शेअर करु नये, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटवरून म्हटले आहे.  

दरम्यान, एएमयूच्या विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन केले होते. यावेळी विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता. 

टॅग्स :पृथ्वीराज चव्हाणदेवेंद्र फडणवीसनागरिकत्व सुधारणा विधेयक