देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे -छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 07:41 AM2021-06-27T07:41:37+5:302021-06-27T07:42:21+5:30

वडेट्टीवार यांनी, पक्षाचे विचार बाजूला ठेवून ज्या समाजाने आपल्याला मोठे केले त्यासाठी एक व्हा, असे आवाहन ओबीसी नेत्यांना केले.

Devendra Fadnavis should lead the OBC community - Chhagan Bhujbal | देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे -छगन भुजबळ

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे -छगन भुजबळ

googlenewsNext

लोणावळा : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दयावर महाराष्ट्रात भाजपने चक्काजाम आंदोलनाची हाक दिलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची ऑफर दिली आहे. येथे सुरू असलेल्या ओबीसी व्हीजेएनटी न्याय्य हक्क समितीच्या चिंतन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माणिकराव ठाकरे, बबनराव ढाकणे, नारायण मुंडे, बाळासाहेब सानप, ईश्वर बाळबुधे, अरुण खरमाटे, साधना राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

वडेट्टीवार यांनी, पक्षाचे विचार बाजूला ठेवून ज्या समाजाने आपल्याला मोठे केले त्यासाठी एक व्हा, असे आवाहन ओबीसी नेत्यांना केले.

फडणवीसांशी चर्चेला बिंदू चौकात या - पाटील
कोल्हापूर : मंत्री छगन भुजबळ यांनी पुड्या न सोडता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करण्यासाठी कोल्हापूरच्या बिंदू चौकात यावे, असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

बावनकुळे म्हणाले...?
देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये जो अध्यादेश काढला. त्यावर सही करू नका, असे मला चंद्रशेखर बावनकुळे यांनी येऊन सांगितले होते. कारण सदरच्या अध्यादेशात के. कृष्णमूर्ती निकालातील इम्पिरिकल डाटा व ट्रिपल टेस्टला बगल दिली होती. त्यामुळे सदर अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर झाले असते तरी तो कायदा टिकला नसता, असा गौप्यस्फोटही  छगन भुजबळ यांनी केला.

Web Title: Devendra Fadnavis should lead the OBC community - Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.