Join us

"संजय राऊत यांची अवस्था केविलवाणी, सांगताही येत नाही अन्...", फडणवीसांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 4:13 PM

Devendra Fadnavis On Sanjay Raut: हायकोर्टानं दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निर्णयाबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं.

Devendra Fadnavis On Sanjay Raut: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलींच्या आरोपांबाबत आज हायकोर्टानं याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निकाल दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 

"हायकोर्टानं दिलेल्या निकालानंतर देशमुखांनी राजीनामा दिला. उशिरा का होईना त्यांनी राजीनामा दिला. महाविकास आघाडीचं हे सरकार जनतेच्या मनातलं सरकार नाही. हे आता सव्वा वर्षानंतर राज्यातील जनताच अनुभवत आहे. यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळं फासण्याचं काम केलं आहे", असा जोरदार घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

"मी सरकारशी संबंधित व्यक्ती नाही, मी बोलणं योग्य नाही", कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

हायकोर्टानं दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निर्णयाबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. "मी सरकारशी संबंधित व्यक्ती नाही. त्यामुळे मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. राज्य सरकार कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करुन प्रतिक्रिया देईल", असं संजय राऊत यांनी म्हटलं. त्याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आलं असताना त्यांनी मिश्किल हास्य करत राऊत यांच्या विधानाची खिल्ली उडवली. 

मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा

"संजय राऊत यांची केविलवाणी अवस्था झाली आहे. या सरकारमुळे त्यांना आता सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही अशी अवस्था झालीय. याआधीही सरकारचा बचाव करण्यासाठी काहीच मुद्दे त्यांच्याजवळ नसतात तेव्हा ते सरकारशी संबंध नसल्याची विधानं करतात आणि स्वत:ला बाजूला ठेवतात", असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीससंजय राऊतपरम बीर सिंगमुंबई पोलीसअनिल देशमुख