नारायण राणेंना बजावलेल्या नोटिसीवरुन देवेंद्र फडणवीस संतापले; सिंधुदुर्ग पोलिसांना कायदाच दाखवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 01:37 PM2021-12-30T13:37:18+5:302021-12-30T13:38:20+5:30

संबंधित पोलिसांविरोधात FIR नोंदवला नाही, तर भाजपा खटला दाखल करेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

devendra fadnavis slams sindhudurg police over notice issue narayan rane in nitesh rane case | नारायण राणेंना बजावलेल्या नोटिसीवरुन देवेंद्र फडणवीस संतापले; सिंधुदुर्ग पोलिसांना कायदाच दाखवला!

नारायण राणेंना बजावलेल्या नोटिसीवरुन देवेंद्र फडणवीस संतापले; सिंधुदुर्ग पोलिसांना कायदाच दाखवला!

googlenewsNext

मुंबई: आताच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि संतोष परब या शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज आणि याप्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना सिंधुदुर्गपोलिसांनी बजावलेली नोटीस यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनीनारायण राणे यांना नोटीस बजावल्याप्रकरणी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चांगलेच संतापले असून, पोलिसांना त्यांनी थेट वकिली भाषेत प्रत्युत्तर देत कायदाच दाखवला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी एका मागून एक ट्विट करत सिंधुदुर्ग पोलिसांवर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते! सीआरपीसी १६० ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नारायण राणेंना नोटीस देऊन साक्षीसाठी बोलावणे कायदेशीर अपराध

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलिस अधिकाऱ्यांवर IPC 166A अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी आहे. आणि असे न केल्यास भाजपा CRPC 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल!, असे देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? हे कुणालाही माहीत नाही. नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित नाही आणि मी ते तुम्हाला का सांगू? असे नारायण राणे यांनी म्हटले होते. याचा अप्रत्यक्ष अर्थ नारायण राणे यांना नितेश राणे यांच्यासंदर्भात माहिती तर नाही ना, असाही होत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नारायण राणे यांना नितेश राणे यांच्या संदर्भात विचारणा करत ही नोटीस बजावली असल्याचे समजते.
 

Web Title: devendra fadnavis slams sindhudurg police over notice issue narayan rane in nitesh rane case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.