Join us

देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा विश्वास दाखवला; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 10:33 AM

राज्यातील सर्वात मोठा महामार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्या रविवार ११ डिसेंबर रोजी लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे.

राज्यातील सर्वात मोठा महामार्ग समृद्धी महामार्गाचं उद्या रविवार ११ डिसेंबर रोजी लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाची ट्रायल घेतली. समृद्धी महामार्गाचे काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते, या संदर्भातील  किस्से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत सांगितले आहेत. 

'समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडण्यात आली तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा माझ्याकडे एमएसआरडीचे खातं होतं, त्यावेळी मी मंत्री होतो त्यावेळी माझ्याकडे ही जबाबदारी होती. त्यावेळी माझ्याकडे विश्वासाने ही जबाबदारी दिली होती. काम सुरू झालं तेव्हा मी मंत्री होतो आणि आता मी मुख्यमंत्री आहे याचा मला आनंद वाटतो, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

कुजबुज! कल्याणच्या सभेपूर्वी अचानक सुषमा अंधारेंच्या डोळ्यापुढे आली अंधारी, कारण...

'माझ्यासाठी हा महामार्ग लकी आहे, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे. हा प्रकल्प सोपा नव्हता, अनेक चॅलेंजस होते. हा प्रकल्प सुरू करताना एमएसआरडीसीवर साडे सहा कोटी कर्ज होते. अथक प्रयत्नातून हा प्रकल्प सुरू झाला. केंद्रातून सर्व परवानग्या लगेच मिळत गेल्या त्यामुळे प्रकल्प आज पूर्ण झाला आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

समृद्धी महामार्ग राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावेल, असा विश्वास मला आहे.देवेंद्र फडणवीस यांनीच मला समृद्धी महामार्गाची जबाबदारी दिली होती. काही लोकांनी या महामार्गाला विरोध केला, पण तरीही याचे काम पूर्ण झाले, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.     

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीससमृद्धी महामार्ग