Join us

Kirit Somaiya: किरीट सोमय्या हल्ला प्रकरण दिल्ली दरबारी; देवेंद्र फडणवीस लिहिणार पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 1:18 AM

किरीट सोमय्या यांनी अधिकृतपणे पोलिसांना कळवलं होतं मी भेटायला येत आहे. भेट झाल्यानंतर खार पोलीस स्टेशनबाहेर ७० ते ८० जणांचा जमाव असून तो माझ्यावर हल्ला करणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Naveet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करणार असा इशाऱ्या दिल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले. गेल्या २ दिवसांपासून शिवसैनिक मातोश्रीच्या बाहेर ठिय्या मांडून बसले होते. शनिवारी सकाळी राणा दाम्पत्याच्या खार येथील घराबाहेरही शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले. या वादानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला खार पोलीस स्टेशनला नेले. मात्र रात्री उशीरा या प्रकरणामुळे शिवसेना-भाजपा संघर्ष पाहायला मिळाला.

भाजपा नेते किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) हे राणा दाम्पत्याला भेट देण्यासाठी खार पोलीस स्टेशनला निघाले. मात्र त्याठिकाणी असलेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या वाहनावर दगडफेक, बाटल्या फेकून जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे संतापलेले भाजपा कार्यकर्तेही जमा झाले. भाजपा नेते आशिष शेलार(Ashish Shelar), आमदार योगेश सागर, मोहित कंबोज यांच्यासह अनेक कार्यकर्ते वांद्रे पोलीस स्टेशनबाहेर जमले असून त्याठिकाणी शिवसेनेविरोधात घोषणा दिल्या जात आहेत.

आता हा संपूर्ण प्रकार दिल्ली दरबारी जाणार असल्याचं पुढे आले आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी किरीट सोमय्या यांचावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी" होम सेक्रेटरी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहिणार असून जबाबदारी न पाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी करणार आहे. फडणवीस म्हणाले की, किरीट सोमय्या हे झेड प्रोटेक्शनमध्ये आहेत. किरीट सोमय्या यांनी अधिकृतपणे पोलिसांना कळवलं होतं मी भेटायला येत आहे. भेट झाल्यानंतर खार पोलीस स्टेशनबाहेर ७० ते ८० जणांचा जमाव असून तो माझ्यावर हल्ला करणार आहे. तुम्ही रोड क्लिअर करा, मी बाहेर जातो असंही पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांनी कुठलीही कार्यवाही न करता शिवसैनिकांच्या गुंडांना हल्ला करण्याची परवानगी दिली असा आरोप फडणवीसांनी केला.

दरम्यान, पोलीस संरक्षण देऊ शकत नसतील तर कायदा आणि सुवेवस्थाचा बोजवारा उडाला आहे. पोलिसांनी पोलिसांची अब्रू घालवली आहे. पोलीस सरकारच्या दबावाखाली वागत आहे. लोकशाही पायाखाली तुडवली जाते ही परिस्थिती भयावह आहे. सगळी कलमं जामीनपात्र असूनही एका महिलेला कस्टडीत ठेवता येत नाही हे माहिती असतानाही कायदा पायदळी तुडवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय डावलून तिथे ठेवले आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसकिरीट सोमय्याभाजपाशिवसेना