Join us

चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा?, कारण...; अवघ्या ३ शब्दात अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 11:08 AM

Amruta Fadnavis Answer to Nawab Malik: नवाब मलिकांनी सकाळी ट्विटरवर देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध आहेत. फडणवीसांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांनी(Nawab Malik) केला आहे. मुंबई क्रुझवर NCB ने केलेल्या कारवाईनंतर राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. यातील तपास अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यावर मलिकांनी निशाणा साधला होता. त्यानंतर आता हे प्रकरण भाजपाशी जोडले गेले आहे.

नवाब मलिकांनी सकाळी ट्विटरवर देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला. त्यानंतर भाजपाचे ड्रग्स पेडलरशी काय कनेक्शन? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवर आरोप लावले. आता यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन नवाब मलिकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटलंय की, चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण *विनाशकाले विपरीत बुद्धी* असते. असं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक काय म्हणाले?

ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणं आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून जयदीप राणा काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांवर साधला निशाणा

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलर यांच्यासोबत संबंध आहेत. या सगळ्या खेळामध्ये प्रतीक गाभा हा मुख्य खेळाडू असून, त्याच्याबाबत उलगडा लवकरच करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांचा वाझे असून, त्याचा उद्धव ठाकरेंशी संबंध नाही. मात्र युती सरकारमध्ये भाजपा आणि शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर नीरज गुंडे फडणवीस यांचा निरोप घेऊन उद्धव ठाकरेंकडे जात होता, असा दावा मलिक यांनी केला.

टॅग्स :अमृता फडणवीसनवाब मलिकभाजपा