'शिंदे सरकार'मध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार; अमित शाहा यांनी केलं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 07:13 PM2022-06-30T19:13:27+5:302022-06-30T19:13:55+5:30

राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे शिंदे गट एकत्र येत सत्तास्थापन करणार आहेत.

Devendra Fadnavis will be the Deputy Chief Minister in 'Shinde Government'; Congratulations by Amit Shah | 'शिंदे सरकार'मध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार; अमित शाहा यांनी केलं अभिनंदन

'शिंदे सरकार'मध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार; अमित शाहा यांनी केलं अभिनंदन

Next

मुंबई - राज्याच्या राजकारणात एकापाठोपाठ एक मोठे ट्विस्ट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील तर देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावं असे निर्देश भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतले आहे. त्यामुळे जे. पी नड्डा यांच्या आदेशाचा मान राखत आणि फडणवीस यांनी मोठे मन दाखवले आणि सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील. 

राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे शिंदे गट एकत्र येत सत्तास्थापन करणार आहेत. या सर्व घडामोडीत एकनात शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. त्यामुळे आता राज्यात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील. 

जे. पी नड्डा काय म्हणाले?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यातून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्विकारुन सत्तेत राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या व्हिडिओत जेपी नड्डा म्हणतात की, ''महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी मोठ्या मनाने सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आमच्या नेत्याचे चरित्र दिसून येते. आम्हाला पदाची लालसा नाही, हे यातून स्पष्ट होते,'' असे नड्डा म्हणाले. 

Web Title: Devendra Fadnavis will be the Deputy Chief Minister in 'Shinde Government'; Congratulations by Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.