"देवेंद्रजी मस्टर मंत्री नसून मास्टर, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 09:28 AM2023-08-07T09:28:24+5:302023-08-07T09:42:07+5:30

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना, ते केवळ मस्टरमंत्री का, असे म्हणत वाढीव उपमुख्यमंत्रीपदाच्या संख्येवरुन टोला लगावला होता

"Devendraji is not a master minister but a master, it is because of his masterstroke that you have to sit at home", Chandrashekhar bawankule | "देवेंद्रजी मस्टर मंत्री नसून मास्टर, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं"

"देवेंद्रजी मस्टर मंत्री नसून मास्टर, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं"

googlenewsNext

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या भाजपावर जोरदार हल्ला चढवला. मुंबईतील रंगशारदा येथे शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह केंद्रातील मोदी सरकावर आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवरही जोरदार निशाणा साधला. ज्यांना घराण्यांचा आगापिछा नाही ते घराणेशाहीवर टीका करतात, असा खोचक टोलाही लगावला.

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना, ते केवळ मस्टरमंत्री का, असे म्हणत वाढीव उपमुख्यमंत्रीपदाच्या संख्येवरुन टोला लगावला होता. त्यावर, आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटवरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, देवेंद्र फडणवीस हे मस्टरमंत्री नसून मास्टर आहेत, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं, असा पलटवार बावनकुळेंनी केलाय.

तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला. नरेंद्र मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं, असे बावनकुळे यांनी म्हटलंय. 

तेव्हा रामभक्तांवर गुन्हे दाखल केले

ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय?, असा सवाल भाजपने केलाय. औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. २०२४ सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय. 

उद्धव ठाकरेंनी उडवली फडणवीसांची खिल्ली

उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका केली. सहनही होईन आणि सांगताही येईना अशी अवस्था फडणवीसांची झालीय. एक चढला, दुसरा चढला, आता गोविंदाचे थर लागतात की काय? किती उपमुख्यमंत्री? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. एक पक्ष चोरला, दुसरा चोरला आता काँग्रेस फोडणारयंत म्हणे, एक झाला, दुसरा झाला, तीन-चार-पाच.. अरे अजून किती उपमुख्यमंत्री करणार? मग देवेंद्र फडणवीसांकडे काय फक्त मस्टरमंत्री... किती आले, किती आले... असे म्हणत् उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवली. तसेच, भाजपामध्ये आता राम उरला नाही, केवळ आयाराम आहेत. आमच्या ह्रदयात राम आहे, तो तुम्ही काढू शकत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

Web Title: "Devendraji is not a master minister but a master, it is because of his masterstroke that you have to sit at home", Chandrashekhar bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.