Join us  

देवीदास पिंगळेंची जामिनासाठी हायकोर्टात धाव

By admin | Published: January 05, 2017 4:10 AM

नाशिक एपीएमसी घोटाळ्यातीलआरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांची गेल्याच आठवड्यात, नाशिक सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका करण्यासाठी नकार दिल्याने

मुंबई : नाशिक एपीएमसी घोटाळ्यातीलआरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांची गेल्याच आठवड्यात, नाशिक सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका करण्यासाठी नकार दिल्याने, त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने एका आठवड्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ठेवली आहे.२५ आॅक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ५७ लाख ७३ हजार ८०० रुपये एका कारमधून जप्त केले. त्यावरून, पोलिसांनी गाडीमधील तिघांची आणि त्यानंतर पिंगळे यांची चौकशी केली. पिंगळे यांची तब्बल दोन तास चौकशी करण्यात आल्यानंतर, २२ डिसेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली. एपीएमसीच्या कर्मचाऱ्यांकडून पिंगळे लाच घेत असल्याचा आरोप एसीबीने केला आहे. ही रक्कम बेहिशेबी असल्याचेही एसीबीने म्हटले आहे. मात्र, ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची असल्याचा दावा पिंगळे यांनी केला आहे. २९ डिसेंबर रोजी नाशिक सत्र न्यायालयाने पिंगळे यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे पिंगळे यांनी अ‍ॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ‘हा गुन्हा केवळ कागदोपत्री आहे. ज्यांच्याकडून पैसे जप्त करण्यात आले, त्या आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे. (प्रतिनिधी)