Join us

"औरंगजेबाच्या भक्तांना एकदिवस त्याच कबरीत जावं लागेल...", संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 09:59 IST

एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता वादाला तोंड फुटले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई-

एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता वादाला तोंड फुटले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. औरंगजेब हा काही साधू-संत नव्हता. महराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्याच्या कबरीवर तुम्ही दर्शनासाठी जात असेल तर एक दिवस तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल इतकं लक्षात ठेवा, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

"संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे हे महाराष्ट्राला अशांत करण्याचं राजकारण ओवेसी बंधू करत आहेत. महाराष्ट्रावर चाल करणारा २५ वर्ष रडत राहीला. त्याला कधीच यश मिळालं नाही. औरंगजेब काही साधू संत नव्हता. इतिहास तुम्हाला सगळं सांगेल. औरंगजेबाच्या कबरीवर महाराष्ट्राला आव्हान देण्याची गोष्ट तुम्ही करत असाल तर ते आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. जे औरंगजेबाचं झालं तेच त्याच्या भक्तांचंही होईल", असा घणाघात संजय राऊत यांनी केला. 

'मविआ'च्या नेत्यांनी काळजीपूर्वक बोलावंकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठीत सुरा खुपल्याचा आरोप केल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनी काळजीपूर्वक विधानं केली पाहिजेत. महाविकास आघाडीला तडा जाईल असं काम करू नये असं सगळ्यांचं म्हणणं असल्याचं ते म्हणाले.  

काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर शिवसेना संवेदनशीलकाश्मिरी पंडित आजही सुरक्षित नाहीत. पाकिस्तानकडे फक्त बोट दाखवू नका कठोर पावलं उचला, असा केंद्राला सल्ला देतानाच संजय राऊत यांनी शिवसेना काश्मिरी पंडितांच्या मुद्द्याकडे संवेदनशीलपणे पाहत असल्याचं म्हटलं आहे.

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाऔरंगाबाद