मुरुड डेपोवर धडकली प्रवासी संघटना

By Admin | Published: December 9, 2014 10:35 PM2014-12-09T22:35:55+5:302014-12-09T22:35:55+5:30

मुरुड - महालोर एसटी जळीत प्रकरणी सोमवारपासून संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. आज प्रवासी संघटनेसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मुरुड एस.टी. आगारावर धडकले.

Dhadkali Expatriate Organization at Murud Depot | मुरुड डेपोवर धडकली प्रवासी संघटना

मुरुड डेपोवर धडकली प्रवासी संघटना

googlenewsNext
आगरदांडा :  मुरुड - महालोर एसटी जळीत प्रकरणी सोमवारपासून संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. आज प्रवासी संघटनेसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मुरुड एस.टी. आगारावर धडकले. विभागीय नियंत्रक अजित गायकवाड यांच्यासमक्ष यावेळी आगाराच्या कारभाराचे पाढे वाचण्यात आले.
महालोर गावात जाणारी एसटी गाडी नियमित मेंटेनन्स नसल्याने जळाली असे प्रवाशांचे मत आहे. आगारात सुमारे 2क् गाडय़ा निकृष्ट आहेत, तसेच 3 गाडय़ा भंगारात काढल्या इतपत खराब आहेत. एशियाड गाडय़ांऐवजी लाल गाडी सुटणो, तासनतास उशिरा गाडय़ा येणो, गाडी ब्रेक डाऊन होणो अशा समस्या नित्याच्याच झालेल्या आहेत. काही वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणारा डेपो आज भीषण व भयावह बनल्याची भावना पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किरण बाथम व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन कासेकर यांनी विभागीय अधिकारी अजित गायकवाड यांच्याशी व्यक्त केली. यावेळी प्रवासी संघटनेचे सचिव o्रीकांत सुर्वे, रायगड जिल्हा युवा उपाध्यक्ष कुणाल सतविडकर, नगरपरिषदेचे शिक्षण सभापती प्रकाश सरपाटील, सुवक काँग्रेस नेते अभिजीत सुभेदार, माजी नगरसेवक किसन बळी, डावरे, प्रकाश कासेकर, रुपेश जामकर आदींनी असंतोष व्यक्त केला.
महालोर गाडीचा चालक महेंद्र फकाळे यांना येत्या 26 जानेवारीला शौर्य पदक देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी आलेल्या पक्षीय कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी विभागीय अधिकारी अजित गायकवाड यांच्याकडे केली. 
आगारामधील कोणतीही गाडी धुतली जात नाही व स्वच्छ केली जात नाही. आगार व्यवस्थापकांचे कर्मचारी व आगाराच्या नियोजनात नियंत्रण नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश कासेकर यांनी दिली. आगारामधून सुटणा:या गाडय़ांना चौलमधून ठेवलेला कोटा त्वरित रद्द करावा, अशी मागणी नाझरे यांनी केली. स्वच्छतागृह सुरु करावे, प्रवाशांना उत्तम सेवा द्यावी, याबाबत दोन आठवडय़ात सुधारणा न दिसल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)
 
च्देशभरात ग्रामस्वच्छता अभियान चालू असताना या आगारामधील अस्वच्छता पाहून येथे स्वच्छतेवर बहिष्कार घातल्याचा संशय येतो. शालेय विद्यार्थी शाळेत जाताना व घरी परतताना अनेकदा नेहमीच्या गाडी ऐवजी एशियाड सोडली जाते. अशावेळी विद्याथ्र्याना अतिरिक्त आर्थिक फटका बसतो. हा प्रकार चुकीचा असल्याची प्रतिक्रिया रुपेश पाटील यांनी व्यक्त केली. 

 

Web Title: Dhadkali Expatriate Organization at Murud Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.