धाकधूक... चिंता... सुटकेचा निश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 01:15 AM2020-06-04T01:15:41+5:302020-06-04T01:16:14+5:30

निसर्ग वादळाने भरली धडकी : मुंबईकरांनी दिला एकमेकांना हात, पोलिसांना सलाम

Dhakdhuk ... Anxiety ... A sigh of relief from cyclone Nisarga | धाकधूक... चिंता... सुटकेचा निश्वास

धाकधूक... चिंता... सुटकेचा निश्वास

googlenewsNext

टीम लोकमत । गौरीशंकर घाळे, सचिन लुंगसे, स्रेहा मोरे, गौरी टेंबभकर-कलगुटकर, मनोहर कुंभेजकर, सीमा महांगडे, ओमकार गावंड


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निसर्ग वादळ मुंबईवर धडकणार आहे, सज्ज राहा, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार महापालिका, अन्य आत्पकालीन यंत्रणांनी तयारी केली. मुंबईकरांनी सतर्क राहा, असे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले. त्यामुळे बुधवारची सकाळ उजाडली ती चिंतेनेच. पावसाने मंगळवारी रात्रीपासूनच झोडपायला सुरुवात केली होती. परिणामी नागरिकांची धाकधूक वाढली होती. बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. अपेक्षेप्रमाणे पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांनी निराशा केली नाही. तेथे पाणी तुंबले. घरांचे छप्पर उडाले. काही मुंबईकरांनी घरातच राहणे पसंत केले. तर काही जणांनी पावसाची मज्जा घेतली. अखेर वादळाचे संकट टळले आणि मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला...


कांदिवली, बोरीवली
मुंबईचा निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी सकाळपासून कांदिवली बोरिवली, गोराई, चारकोप परिसरात वाºयासह पावसाने आपली उपस्थिती आणि निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम दाखविला. सकाळपासूनच हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या या इशाºयाच्या धर्तीवर मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाºयाचा वेग आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनानंतर नागरिकांनी पावसात घरात थांबणेच सुरक्षिततेचे समजले, यामुळे रस्त्यांवर वर्दळ कमीच दिसून आली. मात्र चक्रीवादळाचा रोख उत्तरेकडे सरल्यानंतरही पाऊस आणि वाºयाचा वेग या भागांत कायमच असल्याचे दिसून आले. अनेक नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनानंतर घरांच्या छपरांवर आणि पत्र्यांवर जड सामान ठेवून ते उडणार नाहीत याचीही काळजी घेतल्याचे दिसून आले.

पूर्व उपनगरात पडझड...
च्पूर्व उपनगरात विशेषत: डोंगराळ भागात काही प्रमाणात पडझड दिसून आली. यात, घरांच्या किरकोळ नुकसानासहित वाहनांचे नुकसान झाले.
च्मुलुंड परिसरात सकाळीच मिठागर नगर तसेच खाडीलगत असलेल्या नागरिकांना पोलिसांनी रूट मार्चद्वारे नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना दिल्या. झाडांंच्या फांद्या पडत असल्याने विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला होता.
च्मुलुंड कॉलनी, खिंडीपाडा, रमाबाईनगरसह विक्रोळीत सूर्यानगर परिसरातील डोंगराळ भागात वाºयामुळे पत्र्यांची घरे असणाऱ्यांचे किरकोळ नुकसान झाले. वाहनांवर झाडे पडून वाहनांचे नुकसान झाले.

निसर्ग वादळाचा चेंबूरच्या डोंगराळ भागाला फटका
निसर्ग वादळाचा मुंबईत काही ठिकाणी मोठा परिणाम जाणवला. चेंबूरच्या लालडोंगर परिसरातील डोंगरावरील विभागात झाड तसेच झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. तसेच या ठिकाणी खासगी विकासकाद्वारे बसविण्यात आलेले लोखंडी पत्रेही वाºयामुळे वाकले. यामुळे संध्याकाळपर्यंत परिसरात झाडांच्या फांद्यांचा व पानांचा खच जमा झाला होता. परिसरात कोणत्याच नागरिकाच्या घराचे नुकसान झाले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने एक दिवस आधीच काही कुटुंबांना जवळच असलेल्या एसआरए इमारतीत स्थलांतरित केले. बुधवारी सकाळपासूनच पालिकेकडून चेंबूरच्या विविध परिसरात चक्रीवादळापासून सावध राहण्याचे लोकांना आवाहन केले जात होते. दरम्यान, गुरुवारीही नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले गेले आहे. तसेच डोंगराळ भागात हवेचा प्रभाव जास्त जाणवत असल्याने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

चक्रीवादळाच्या धाकाने सामसूम
हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिला. प्रशासनासह नागरिकही या दृष्टीने सज्ज होते. सुदैवाने मुंबईवरचा धोका टळला. त्यामुळे बुधवारचा दिवस म्हणजे मान्सूनच्या काळातील नेहमीचा पावसाळी दिवसच ठरला.
चक्रीवादळाच्या इशाºयामुळे मुंबईतील सर्व व्यवहार ठप्प होते. दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक लॉकडाउनमध्ये होते. पाचव्या टप्प्यात अनलॉक सुरू होण्याच्या मुहूर्तावरच निसर्ग चक्रीवादळामुळे कडकडीत लॉकडाउन पाळायची वेळ लोकांवर आली.
चक्रीवादळाच्या धाकाने दादर टीटी, पारशी कॉलनी, हिंदू कॉलनी, दादर पश्चिमेतील गोखले रोडचा परिसर, शिवाजी पार्क, सिटी लाइट, शितलादेवी मंदिर परिसरात सायंकाळपर्यंत अक्षरश: सामसूम होती.

Web Title: Dhakdhuk ... Anxiety ... A sigh of relief from cyclone Nisarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.