ढाक्कु माक्कुमचा उत्साह शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:42 AM2017-08-15T01:42:32+5:302017-08-15T01:42:35+5:30

उच्च न्यायालयाने दिलेल्या दिलाशानंतर मुंबईसह ठाणे शहरात दहीहंडीचा उत्साह पराकोटीला पोहोचला आहे.

Dhakku Makkum's enthusiasm Shigella | ढाक्कु माक्कुमचा उत्साह शिगेला

ढाक्कु माक्कुमचा उत्साह शिगेला

Next

मुंबई : उच्च न्यायालयाने दिलेल्या दिलाशानंतर मुंबईसह ठाणे शहरात दहीहंडीचा उत्साह पराकोटीला पोहोचला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे दहीहंडीची उंची उंचच उंच गेली असली, तरी नोटाबंदीमुळे बक्षिसांची घागर मात्र उताणी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा हंड्यांचे प्रमाण अधिक असले, तरी उंचीचे निर्बंध उठविल्याने, पुन्हा एकदा रकमांसाठी गोविंदांना जास्त थर रचावे लागणार आहेत. मुंबईसह ठाण्यात लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या हंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात गिरणगावातील काळाचौकीच्या भगतसिंह मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेली हंडी चर्चेचा विषय ठरली आहे. गोविंदासाठी न्यायालयाने सुचविलेल्या सर्व अटी पूर्ण केल्याचा दावा मनसेचे उपविभागाध्यक्ष संतोष नलावडे यांनी केला आहे. नलावडे यांनी सांगितले की, गोविंदासाठी सेफ्टी हेल्मेटपासून अपघातग्रस्त गोविंदासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था मैदानावर करण्यात आलेली आहे. एकूण ५ लाखांहून अधिक बक्षिसांची रक्कम असली, तरी ५ थरांपासून ९ थरांपर्यंतच्या हंड्या गोविदांना या ठिकाणी फोडता येतील. नोटाबंदीमुळे परळ गावातील दहीकाला उत्सव रद्द केला असला, तरी शिवडी विधानसभेचा उत्सव कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लालबाग येथील राकेश जेजुरकर म्हणाले की, उच्च न्यायालयाने निर्बंध उठविले असले, तरी केवळ ७ थरांपर्यंतच मनोरे रचण्यास सांगितले जातील. गोविदांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, म्हणून
कमीत कमी थरांमध्ये अधिकाधिक रक्कम देण्याचा आयोजकांचा मानस आहे.
>लाखोंची हंडी कोण फोडणार?
मुंबईसह ठाणे शहरात ९ थरांसाठी लाखो रुपयांच्या हंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह शिवसेनेचे पदाधिकारी आघाडीवर आहेत. मनसेच्या शिवडी विधानसभेने काळाचौकीच्या भगतसिंह मैदानात आयोजित केलेल्या उत्सवात, ९ थरांसाठी १ लाखाचे पारितोषिक ठेवल्याचे नंदकुमार चिले यांनी सांगितले, तर ठाण्यातील नौपाडा येथील भगवती मैदानात ९ थरांची सलामी देणाºया पथकाला ११ लाख रुपये देण्याचा दावा मनसेच्या ठाणे शहर कार्यालयाने केला आहे. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनीही बोरीवलीतील देवीपाडा मैदानात आयोजित केलेल्या उत्सवात ९ थरांसाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक ठेवले आहे.
>हेअर स्टाइलवरही स्वातंत्र्य दिन, दहीहंडीचा फिव्हर
लोअर परळ परिसरात गोविंदासह अन्य तरुणांनी स्वातंत्र्य दिन, तसेच दहीहंडी जल्लोषात साजरा करण्यासाठी, अनोखी हेअर स्टाइल करण्यासाठी सलूनमध्ये गर्दी केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा तर गोपाळकाल्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे चित्र काढण्याच्या हेअर स्टाइलचा ट्रेंड सध्या तरुणवर्गात सुरू आहे. सागर मोरे यांच्या लोअर परळच्या सलूनमध्ये सकाळपासून १०० हून अधिक तरुणांनी अशा प्रकारे हेअर स्टाइल केली आहे. अनोखी अशी हेअर स्टाइल करून घेण्यासाठी तरुणांची मोरे यांच्या सलूनबाहेर रांग लागलेली आहे.
>कुठे कुठे रंगणार चुरस?
आयोजक : नंदू चिले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवडी विधानसभा.
कुठे : शहीद भगत सिंग मैदान, अभ्युदयनगर, काळाचौकी.
वेळ : सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत.
बक्षीस : एकूण बक्षिसे ५ लाख ५० हजार रुपये.
आयोजक : राकेश जेजुरकर
कुठे : विष्णू पिंगळे मार्ग, तेलेगल्ली नाका, रंगारी बदक चाळसमोर, लालबाग.
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत.
बक्षीस : ५ लाख ५५ हजार ५५५.
आयोजक : श्री गणेश प्रताप अखंड सेवा शक्तिपीठ ज्ञास.
कुठे : दफ्तरी रोड आणि जय जवान लेन, श्री भगवती भवानी गणेश देवस्थान चौक, मालाड पूर्व.
वेळ : सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत.
बक्षीस : ज्ञानेश्वरी, तुळशीचे रोप, श्रीकृष्णाची मूर्ती आणि मानधन.


आयोजक :
पाड्या रामपूरकर
कुठे : पंचशिल सोसायटी, इमारत क्रमांक ३च्या पटांगणात, वरळी नाका.
वेळ : सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत.
बक्षीस : ५,५५,५५५.
आयोजक - प्रकाश सुर्वे
कुठे : देवीपाडा मैदान, बोरीवली (पू).
वेळ : सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत.
बक्षीस : ५ थर ३ हजार रुपये, ६ थर ५ हजार रुपये, ७ थर ७ हजार रुपये, ८ थर २१ हजार रुपये, ९ थर १ लाख रुपये.
आयोजक - प्रकाश पाटणकर
कुठे : नक्षत्र मॉल, दादर (प).
वेळ : दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत.
बक्षीस : ११,११,१११
आयोजक : प्रो गोविंदा २०१७
कुठे : ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ४४ पटांगण, वर्तकनगर, ठाणे.
वेळ : सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत.
बक्षीस : ६ थर प्रथम ५ हजार रुपये- द्वितीय ३ हजार रुपये, ७ थर प्रथम १० हजार रुपये - द्वितीय ५ हजार रुपये, ८ थर प्रथम २५ हजार रुपये - द्वितीय १५ हजार रुपये, ९ थर प्रथम १लाख रुपये - द्वितीय ५० हजार रुपये.
आयोजक : उमेश घाडी
कुठे : सेक्टर ६, आंबामाता मंदिरजवळ, चारकोप, कांदिवली (प.)
वेळ : सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत.
बक्षीस : सन्मान चिन्ह, मानधन.
आयोजक : संदीप हुटगी
कुठे : संघवी चौक, एल. बी. एस. मार्ग, नलिनी सावंत उद्यानासमोर, कुर्ला (प.).
वेळ : सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत.
बक्षीस : ५,५५,५५५
आयोजक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठाणे शहर
कुठे : भगवती मैदान, मनसे मध्यवर्ती कार्यालयाच्या बाजूला, विष्णू नगर, नौपाडा, ठाणे.
बक्षीस : ११ लाख

Web Title: Dhakku Makkum's enthusiasm Shigella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.