धनगर समाजाचा आरक्षणासंदर्भात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:10 AM2017-07-31T01:10:16+5:302017-07-31T01:10:16+5:30

यशवंत सेनेतर्फे भायखळा येथील भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान येथे १ आॅगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

dhanagara-samaajaacaa-arakasanaasandarabhaata-elagaara | धनगर समाजाचा आरक्षणासंदर्भात एल्गार

धनगर समाजाचा आरक्षणासंदर्भात एल्गार

Next

मुंबई : यशवंत सेनेतर्फे भायखळा येथील भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान येथे १ आॅगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजप सरकारने आश्वासन देवून ही धनगर समाजाला अजून आरक्षण दिलेले नाही. याच्या निषेधार्थ भाजप सरकार विरोधात यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा काढला जाणार आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या अधिवेशनातच धनगर समाजाला आरक्षण देवू असे, आश्वासन सरकारने दिले होते. परंतु तीन वर्षे होत आली तरीही आरक्षणासंदर्भात कोणतेही सकारात्मक पाऊल उचलण्यास सरकार तयार नाही. राज्यातून निषेध मोर्चाला हजारोंच्या संस्थेने धनगर समाजातील लोक पाठिंबा दर्शविण्यासाठी सहभागी होणार आहेत. अशी माहिती यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे धनगर समाजाच्या मेळाव्यात पंधरा दिवसांत आरक्षण देतो असे आश्वासन दिले होते.
परंतु टीआयएसएसकडे प्रश्न अभ्यासासाठी पाठवून कोणतीही आवश्यकता नसताना आरक्षण टोलवले. शासनाने धनगर समाजाची घोर फसवणूक आणि उपेक्षा केलेली आहे. अशीच फसवणूक होणार असेल कर त्यांचीही सत्ता उलथवून टाकू, असा इशारा सरकारला देण्यात आलेला आहे.

Web Title: dhanagara-samaajaacaa-arakasanaasandarabhaata-elagaara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.