बारामतीचा झटका बसता, शेलार कंपनीचा उडणार फ्युज; शेलार-मुंडेंमध्ये 'काव्ययुद्ध'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 04:58 PM2019-04-11T16:58:29+5:302019-04-11T17:03:35+5:30
राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि भाजपा नेते आशिष शेलार यांच्यात जोरदार जुगलबंदी रंगली आहे.
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि भाजपा नेते आशिष शेलार यांच्यात जोरदार जुगलबंदी रंगली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत बारामती यंदा भाजपा जिंकणार असल्याचं म्हटलं आहे.
तसेच पार्थ पवार यांनी सुप्रिया सुळेंना दिलेल्या कर्जावरूनही शेलारांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. त्याला धनंजय मुंडे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. कमळाबाईचा संसार यंदा मोडण्याची येणार ब्रेकिंग न्यूज, बारामतीचा झटका बसता शेलार कंपनीचा उडणार फ्युज, असंही ट्विट करत धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे ट्विटरवर लिहितात,
कमळाबाईचा संसार ब्रेक होण्याची
नक्कीच येणार ब्रेकींग न्यूज
बारामतीचा झटका बसता
उडणार शेलार कंपनीचा फ्युज!
आजोबा ताई दादा नको रे
तुला पुरेसा आमचा पार्थ आहे
बारामतीचा नाद करु नको
शेलारा विजय आमचा सार्थ आहे!!
कमळाबाईचा संसार ब्रेक होण्याची
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 11, 2019
नक्कीच येणार ब्रेकींग न्यूज
बारामतीचा झटका बसता
उडणार शेलार कंपनीचा फ्युज!
आजोबा ताई दादा नको रे
तुला पुरेसा आमचा पार्थ आहे
बारामतीचा नाद करु नको
शेलारा विजय आमचा सार्थ आहे!!
तत्पूर्वी आशिष शेलारांनीही ट्विट करत सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, बारातमी यंदा भाजपाच जिंकणार, बातमीसाठी एवढं पुरेसं आहे. सुप्रिया सुळेंना टोला लगावत आशिष शेलारांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
आजोबांना आणि ताईंना कर्ज दिलेयं पार्थाने
कशाला पाहतायं या व्यवहाराकडे नकारार्थाने?
ताई म्हणतात, कुटुंबात होत असते असे!
"तोंडी परिक्षा" घेणाऱ्यांनो बघा, उगाचचं तुम्हाला यात बातमी दिसे!
बारामती यावेळी भाजप जिंकणार!
बातमीसाठी तुम्हाला एवढे नाही का पुरेसे?
आजोबांना आणि ताईंना कर्ज दिलेयं पार्थाने
— Chowkidar ashish shelar (@ShelarAshish) April 11, 2019
कशाला पाहतायं या व्यवहाराकडे नकारार्थाने?
ताई म्हणतात, कुटुंबात होत असते असे!
"तोंडी परिक्षा" घेणाऱ्यांनो बघा,उगाचचं तुम्हाला यात बातमी दिसे!
बारामती यावेळी भाजप जिंकणार!
बातमीसाठी तुम्हाला एवढे नाही का पुरेसे? #ChowkidarकेSideEffects