बे त्रिक बेअक्कल, धनंजय मुंडेंनी वाचला दानवेंच्या चुकांचा 'पाढा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 06:05 PM2019-04-03T18:05:44+5:302019-04-03T18:08:26+5:30

गेल्या काही दिवसांपासून रावसाहेब दानवे वादग्रस्त विधान करत आहेत.

Dhananjay Munde criticize on raosaheb danve | बे त्रिक बेअक्कल, धनंजय मुंडेंनी वाचला दानवेंच्या चुकांचा 'पाढा'

बे त्रिक बेअक्कल, धनंजय मुंडेंनी वाचला दानवेंच्या चुकांचा 'पाढा'

googlenewsNext

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून रावसाहेब दानवे वादग्रस्त विधान करत आहेत. त्या विधानांवरून विरोधकांनीही त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. जालन्यात केलेल्या एका विधानामुळे दानवे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दानवे यांनी बोलता बोलता विंग कमांडर अभिनंदन याला हेलिकॉप्टरचा पायलट असं म्हटलं आहे.

खरं तर अभिनंदन हे भारताच्या लढाऊ विमानांचे धडाकेबाज वैमानिक आहेत. या नव्या विधानानंतर दानवेंवर पुन्हा एकदा चहू बाजूंनी टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दानवेंर निशाणा साधला आहे.


धनंजय मुंडेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक बेअक्कल. त्यानंतर त्यांनी 'येडं पेरलं आणि खुळं उगवलं' अशी भाजपाची सगळी गत झाल्याचीही टीका केली आहे. यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष, असंही ते म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच पुलवामाबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले होते की, 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले.' दानवेंच्या या विधानानंतर त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनीही मोदींसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे.

पावणेचारशे रुपयाचा सिलिंडर एक हजार रुपयांपर्यंत गेला. साठ रुपयांची डाळ 120 रुपयांवर गेली. महागाई थांबविण्याचं स्वप्न मोदीनं दाखवलं. त्याच मोदींनी प्रत्येकी किती लूट केली याचा विचार करा. तुम्हाला कळूसुद्धा दिलं नाही. सिलिंडरच्या माध्यमातून दिवसाला सहाशे रुपयांची लूट तुमच्या घरातून केली. 'सपनो के सौंदागर ने सपना दिखाया. आपण स्वप्नात रंगून गेलो. महागाई नसताना महागाई समजली आणि मोदीला उरावर घेतलं, असे विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं होतं. 

Web Title: Dhananjay Munde criticize on raosaheb danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.