Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी 'बाईट' देताना केली धमाल; मुनगंटीवार येताच मोठ्याने ओरडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 11:26 AM2022-08-17T11:26:31+5:302022-08-17T11:28:20+5:30

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Dhananjay Munde makes comment against sudhir mungantiwar and mlas who does not get ministry | Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी 'बाईट' देताना केली धमाल; मुनगंटीवार येताच मोठ्याने ओरडले...

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी 'बाईट' देताना केली धमाल; मुनगंटीवार येताच मोठ्याने ओरडले...

Next

मुंबई-

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गद्दार सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, अशा घोषणाबाजीनं विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. पण या सर्व घोषणाबाजींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना बाईट देताना केलेल्या घोषणाबाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Maharashtra Vidhan Sabha Live: विधानसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. यावेळी सत्ताधारी पक्षातील सुधीर मुनगंटीवार विधानभवनात जात असताना धनंजय मुंडे यांनी "सुधीरभाऊंना कमी दर्जाचं खातं देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो", अशी घोषणाबाजी केली आणि विरोधीपक्षातील सर्व आमदारांनीही पाठिंबा देत सत्ताधाऱ्यांना डिवचलं. इतकंच नव्हे, तर शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट दिसताच धनंजय मुंडे यांनी संजय शिरसाट यांना मंत्रीमंडळात स्थान न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी केली. तर आशिष शेलार येताच शेलारांना मंत्रीपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली. 

लोकशाहीचा खून करणारं सरकार
धनंजय मुंडे यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना शिंदे-फडणवीस सरकार लोकशाहीचा खून करणारं सरकार असल्याचं म्हटलं. तसंच राज्यातील प्रश्नांवर दुर्लक्ष करणारं सरकार असल्याचंही मुंडे म्हणाले. "लोकांनी गुड मॉर्निंग म्हणावं की काय म्हणावं हा ज्याच्या त्याचा अधिकार आहे", असं म्हणत धनंजड मुंडे यांनी फोन कॉलवर हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. 

Web Title: Dhananjay Munde makes comment against sudhir mungantiwar and mlas who does not get ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.