...तर त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या नेत्याचे महिलेवर गंभीर आरोप

By कुणाल गवाणकर | Published: January 14, 2021 05:45 PM2021-01-14T17:45:27+5:302021-01-14T17:58:47+5:30

भाजप आमदार कृष्णा हेगडेंपाठोपाठ मनसेचे नेते मनिष धुरी यांचा रेणू शर्मावर गंभीर आरोप

dhananjay munde mns leader manish dhuri makes serious allegations on renu sharma | ...तर त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या नेत्याचे महिलेवर गंभीर आरोप

...तर त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या नेत्याचे महिलेवर गंभीर आरोप

googlenewsNext

मुंबई: बलात्काराच्या आरोपामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा हेगडे यांनी मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रेणू शर्मानं माझ्याशी संपर्क साधून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हेगडे यांनी केला आहे. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मनिष धुरी यांनीदेखील रेणू शर्मावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. 

"'ती' मलाही मेसेज, कॉल करायची..." भाजपा नेत्याच्या धडक एन्ट्रीने धनंजय मुंडे प्रकरणाला नाट्यमय वळण

रेणू शर्माविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर कृष्णा हेगडेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनसेच्या मनिष धुरी यांच्यासोबतही असाच प्रकार घडल्याचा दावा केला. त्यानंतर मराठी वृत्तवाहिनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना धुरी यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. 'कृष्णा हेगडेंना मी फोन केला होता. कारण २००८-०९ मध्ये माझ्यासोबतही असाच प्रकार घडला होता. रेणू शर्मानं मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता,' असं धुरी यांनी सांगितलं.

आश्चर्यकारक कलाटणी; राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात!

'रेणू शर्मानं माझ्याशी संपर्क साधला होता. ती मला फॉलो करत होती. त्यावेळी मी मनसेचा विभाग अध्यक्ष होतो. तिनं माझ्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न केले. तिला व्हिडीओ अल्बम काढायचा होता. त्यासाठी तिच्याकडून ब्लॅकमेलिंग सुरू होतं. तिचा हेतू लक्षात आल्यावर मी पिच्छा सोडवून घेतला. अन्यथा त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता,' असा दावा धुरी यांनी केला.

तुम्ही त्यावेळी रेणू शर्माविरोधात पोलिसात तक्रार का दाखल केली नाही, असा प्रश्न धुरी यांना विचारण्यात आला. 'महिलेची बदनामी नको म्हणून त्यावेळी मी शांत बसलो. मी त्या महिलेपासून पिच्छा सोडवला होता. त्यामुळे मी शांत राहिलो. पोलिसात तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर मग तिचा आणि माझा संपर्क आला नाही. कदाचित त्यावेळी ती कृष्णा हेगडे किंवा इतर नेत्यांच्या संपर्कात असावी. २०१८-१९ मध्ये तिनं माझ्याशी संपर्क साधला. पण तिचा हेतू माहीत असल्यानं मी तिला टाळलं,' असं धुरींनी सांगितलं.

Read in English

Web Title: dhananjay munde mns leader manish dhuri makes serious allegations on renu sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.