धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:20 PM2020-06-22T12:20:48+5:302020-06-22T12:21:01+5:30

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मुंडेंच्या प्रकृतीविषयी माहिती देऊन, काळजीचं कारण नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर आहे

Dhananjay Munde overcomes corona, will be discharged from hospital soon | धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळणार

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळणार

Next

मुंबई - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. बीडहून मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि बीडमधील धनंजय मुंडे समर्थक थोडे काळजीत आहेत. मात्र, धनंजय मुंडेंनी कोरोनावर मात केली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी आहे. त्यामुळे, धनंजय मुंडेंच्या समर्थकांसाठी ही आनंदाची बातमी असून परळीकरांना या वृत्ताने मोठा दिलासा मिळणार आहे.   

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मुंडेंच्या प्रकृतीविषयी माहिती देऊन, काळजीचं कारण नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर आहे. कोरोनाचं कुठलंही लक्षण त्यांच्यात नाही. फक्त, श्वसनाचा किंचित त्रास जाणवत असल्यानं त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे, असंही यांनी सांगितलं होतं. त्यानंतरस मुंडेंना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांनी कोरोनावर मात केली असून सायंकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल,असे समजते. 

धनंजय मुंडेंच्या कोरोना चाचणीचा एक रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानतंर, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आल्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी, अंबाजोगाई मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वॅब घेतले होते. सुदैवाने, त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, धनंजय मुंडे यांचा मुंबईतील चालक, बीडचा स्वयंपाकी, वाहनचालक अशा ५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंडेंच्या संपर्कातील व्यक्तींनाही क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला होता. धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही उपस्थित असल्यानं, अन्य मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही चाचणी होणार का, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, कुणामध्येही कोरोनाची लक्षणं जाणवलेली नसल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं होतं. 

दरम्यान, धनंजय मुंडे हे कोरोनाची लागण होऊन बरे झालेले तिसरे मंत्री आहेत. याआधी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना कोरोना झाला होता. त्यांनी या आजारावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यानंतर, आता धनंजय मुंडेंही कोरोनावर मात देत रुग्णालयातून बाहेर येत आहेत. 
 

Read in English

Web Title: Dhananjay Munde overcomes corona, will be discharged from hospital soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.