Join us

'धनंजय मुंडेंच्या 25 वर्षांच्या कष्टाचं फळ', अमोल कोल्हेंकडून परळीकरांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 2:43 PM

परळी मतदारसंघात काही घटकांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न केला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या खासदार अमोल कोल्हेंनी विजयानंतर पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर अमोल कोल्हे कुठं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता, कोल्हेंनीच मीडियाला प्रतिक्रिया देताना, राष्ट्रवादीचं यश हे महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ असल्याचं म्हटलंय. तसेच, परळीतील विजयाबद्दलही त्यांनी आपल मत व्यक्त केलं. यावेळी, धनंजय मुंडेंच खास अभिनंदनही त्यांनी केलंय. 

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीला वर्चस्व मिळालं आहे. मात्र, भाजपा आणि शिवसेनेच्या जागा यंदाच्या निवडणुकीत घटल्या आहेत. तुलनेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगलं यश संपादन केलं असून शरद पवारांच्या झंझावती दौऱ्यामुळे राष्ट्रवादीने अर्धशतक पार करत 54 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीने 54 तर काँग्रेसला 44 जागांवर विजय संपादीत करता आला. या विजयानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच दिग्गज नेते आनंदी दिसले, अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, शिवस्वराज्य यात्रेचे स्टारप्रचारक डॉ. अमोल कोल्हे विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये कुठेच दिसले नाहीत. आता, अमोल कोल्हेंनी विजयावर सविस्तर प्रतिक्रिया देताना पवारांच्या साताऱ्यातील सभेचं कौतुक केलंय. तसेच धनंजय मुंडेच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदनही केल. 

परळी मतदारसंघात काही घटकांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न केला. हा निश्चितच दुर्दैवी होता, पण परळीच्या जनतेनं दुर्दैवी प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे मी परळीच्या जनतेचं आभार मानेन, असे म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी धनंजय मुंडेंच्या विजयाचा कौतुक केलंय. तसेच धनजंय मुंडेंचा विजय हा, त्यांच्या 24 ते 25 वर्षांच्या अविरत कष्टाचं फळ असल्याचं कोल्हेंनी म्हटलंय.  

टॅग्स :परळीमुंबईराजकारणधनंजय मुंडेडॉ अमोल कोल्हेविधानसभा निवडणूक 2019