Join us

आंतरराष्ट्रीय नेते रोहित पवार कोणत्या पक्षात जाणार ते सांगावं लागेल; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 3:32 PM

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता.

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मोठं यश मिळाले. यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. यावर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

"आंतरराष्ट्रीय नेते रोहित पवार यांनी रोज उठून एवढे आमदार संपर्कात आहेत हे सांगण्यापेक्षा त्यांची नाव सांगावीत. नाहीतर तुम्ही कुणा, कुणाच्या संपर्कात आहात हे माध्यमांसमोर येईल, असा टोलाही मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला. असंख्य अन्याय अजितदादांनी सहन केले, उद्या तुमच्या अन्याय झाला तर तुम्ही कोणत्या पक्षात जालं हे आम्हाला उद्या माध्यमांसमोर स्पष्ट सांगावं लागेल, असंही मुंडे म्हणाले. 

शेतकऱ्यांचा मुद्दा, अनिल पाटील उत्तर देऊ लागले, मदतीला धनंजय मुंडे आले; जयंत पाटलांनी डिवचलं; सभागृहात काय घडलं?

"आम्ही गहुंजे स्टेडियमला शरद पवार यांचं नाव द्याव यासाठी आम्ही एकत्र असताना निवेदन दिले होते. पण, आजपर्यंत त्यांनी नाव दिलेलं नाही. यावरुन त्यांचं आजोबांवर किती प्रेम आहे हे दिसतं, असंही धनंजय मुंडे म्हणाले. आमच्यासोबत असलेला एकही आमदार त्यांच्यासोबत सोडाच पण अजून कोणाच्या संपर्कात आहेत हे येणाऱ्या काळात कळेल, असंही मुंडे म्हणाले.

जयंत पाटलांनी डिवचलं; सभागृहात काय घडलं?

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरू आहे. आज काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित केला. आमदार थोरात म्हणाले, मागील वर्ष हे टंचाईचे होते, या परिस्थीतही शेतकऱ्यांनी पीक आणली. बारमाही पीक होती त्याच जानेवारी महिन्यात नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे मोठे नुकसान झाले, आता जुलै महिना जवळ आला आहे. सहा महिने होऊनही शेतकऱ्यांसाठी काहीही निर्णय घेतलेला नाही. फक्त कागद फिरत आहेत, याचा अर्थ शेतकऱ्यांबाबत कोणताही ओलावा तुमच्यात नाही. आज नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे होते, पुन्हा खरिपासाठी त्या शेतकऱ्यांना काम करावं लागतं. आता अजुनही सर्व्हे येणार असल्याचं सांगत आहेत, अशी पद्धत कधीच नव्हती. यावर सहा महिने निर्णय नाही, या मुद्द्यावर आता तातडीने निर्णय घेणार का? हा माझा प्रश्न आहे, असा सवाल आमदार थोरात यांनी यावेळी केला. 

टॅग्स :धनंजय मुंडेराष्ट्रवादी काँग्रेसरोहित पवार