मुंबईत उद्या धडकणार धनगर समाजाचा मोर्चा

By admin | Published: January 23, 2017 05:46 AM2017-01-23T05:46:51+5:302017-01-23T05:46:51+5:30

दोन वर्षापूर्वी राज्यात सत्तेत येताना भाजपाचे नेते आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा

The Dhangar community's front will hit the city tomorrow | मुंबईत उद्या धडकणार धनगर समाजाचा मोर्चा

मुंबईत उद्या धडकणार धनगर समाजाचा मोर्चा

Next

बोर्ली -मांडला/मुरुड : दोन वर्षापूर्वी राज्यात सत्तेत येताना भाजपाचे नेते आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता त्या आश्वासनाचे नेमके काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी राज्यातील लाखो धनगर समाजातील बांधवांकडून २४ जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या मोर्चात धनगर समाजातील विविध राजकीय संघटनां सोबतच सामाजिक संस्था, संघटनांचे हजारो प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती धनगर समाजातील ज्येष्ठ नेते गणेश बुधे यांनी शुक्र वारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सरकारने आमच्या आरक्षणासाठी ठाम भूमिका स्पष्ट करावी, यासाठीच हा मोर्चा काढला जाणार असून या निमित्ताने राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका, विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदार संघात सरकारमध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांना आमच्या धनगर आरक्षणाचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला जाणार असल्याचे यावेळी बुधे यांनी सांगितले. सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आश्वासन देऊन त्यासाठीची योग्य अमंलबजावणी केली नाही, यामुळे समाजाची फसवणूक झाली असून यामुळे राज्यभरात सरकारविरोधात एक संतापाचे वातावरण धनगर समाजात निर्माण झाले असल्याची माहितीही यावेळी बुधे यांनी दिली. सरकारने धनगर समाजाची फसवणूक के ली असून राज्यभरात सरकार विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असे गणेश बुधे म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: The Dhangar community's front will hit the city tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.