Join us

Video - यशवंत सेनेकडून मुख्यमंत्र्यांना साडी-चोळीचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 4:09 PM

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचा रोष व्यक्त करत यशवंत सेनेने शुक्रवारी (30 नोव्हेंबर) मुख्यमंत्र्यांना साडीचोळीचा अहेर देण्याचे आंदोलन केले.

ठळक मुद्देधनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचा रोष व्यक्त करत यशवंत सेनेने मुख्यमंत्र्यांना साडीचोळीचा अहेर देण्याचे आंदोलन केले. विधानभवनासमोर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.मराठा समाजाला आरक्षण दिल्यावरही धनगर समाज मात्र आरक्षणापासून वंचित आहे.

मुंबई - धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचा रोष व्यक्त करत यशवंत सेनेने शुक्रवारी (30 नोव्हेंबर) मुख्यमंत्र्यांना साडीचोळीचा अहेर देण्याचे आंदोलन केले. विधानभवनासमोर झालेल्या या आंदोलनात पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

यशवंत सेनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी सांगितले की, विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.  मात्र मराठा समाजाला आरक्षण दिल्यावरही धनगर समाज मात्र आरक्षणापासून वंचित आहे. या प्रश्नावर धनगर नेत्यांना मंत्रीपद देऊन सरकारने गुंडाळले आहे. त्यात कॅबिनेट मंत्री महादेव जानकर खासदार विकास महात्मे आणि राम शिंदे यांचा समावेश आहे. या तीनही नेत्यांनी 10 दिवसांत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

टॅग्स :मुंबईमराठा आरक्षणदेवेंद्र फडणवीस