धारावीत कमी दाबाने पाणीपुरवठा

By admin | Published: October 28, 2015 12:17 AM2015-10-28T00:17:02+5:302015-10-28T00:17:02+5:30

भूमिगत जलबोगद्याच्या कामामुळे २९ ते ३० आॅक्टोबरदरम्यान धारावी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल

Dharav low pressure water supply | धारावीत कमी दाबाने पाणीपुरवठा

धारावीत कमी दाबाने पाणीपुरवठा

Next

मुंबई : भूमिगत जलबोगद्याच्या कामामुळे २९ ते ३० आॅक्टोबरदरम्यान धारावी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. यावर उपाय म्हणून नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मरोशी ते रुपारेलदरम्यान ३ हजार मिलीमीटर व्यासाच्या भूमिगत जलबोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या कामाच्या अनुषंगाने उर्ध्व वैतरणा जलवाहिनीवर सहार अँकर ब्लॉक ते स्काडा केबिन वांद्रेदरम्यान तीन ठिकाणी जोड करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. २९ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जोड करण्याचे काम सुरू होईल. ३० आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता हे काम पूर्ण होईल. या कालावधीत जी/उत्तर विभागातील धारावी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

Web Title: Dharav low pressure water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.