धारावी पुन्हा एक नंबर; रुग्णसंख्या शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:05 AM2021-07-05T04:05:56+5:302021-07-05T04:05:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिकेला कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवण्यात यश येत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेला कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवण्यात यश येत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून धारावी, माहीम आणि दादर या ठिकाणी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे रविवारी धारावी येथे पुन्हा एकदा शून्य रुग्णसंख्या नोंदविण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी धारावीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची नोंद शून्य झाली आहे. धारावी येथे झोपड्या, चाळी आणि इमारती मोठ्या संख्येने आहेत. दाट लोकवस्तीदेखील आहे. याच कारणांमुळे तेथे मोठ्या प्रमाणावर कोरोना पसरला होता. मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनी येथील रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे.
एकूण रुग्णसंख्या
धारावी : ६ हजार ९०१
दादर : ९ हजार ६९८
माहीम : १० हजार २१