मुंबई - धारावी पॅटर्नमुळे दाट झोपडपट्टीतही अनेकवेळा शून्य बाधित रुग्णांचा विक्रम कायम आहे. मात्र मुंबईचे मध्यवर्ती ठिकाणं असल्याने सतत गजबजलेले दादर परिसरात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. दिवाळीत नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढत असताना धारावी मध्ये बाधित रुग्णांची संख्या सलग दोन दिवस शून्य आहे. दादर परिसरात मात्र शनिवारी नऊ बाधित आढळून आले आहेत.
मध्यवर्ती ठिकाण आणि मोठी बाजारपेठ असल्यामुळे दादर परिसरात कायम लोकांची गर्दी असते. तर आशिया खंडातील मोठ्या झोपडपट्ट्यापैकी एक असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान उभे राहिले होते. मात्र जास्तीत जास्त लोकांची चाचणी, तात्काळ निदान, योग्य उपचार असे सूत्र अवलंबल्याने जुलै २०२० मध्ये धारावीत कोरोना नियंत्रणात आला. दिवाळीनिमित्त दादर भागात खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. परिणामी, बाधित रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ दिसून येत आहे.
* आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागाने कोरोनाचा प्रसार कशा प्रकारे रोखता येईल? याचा आदर्श जगापुढे ठेवला. धारावी पॅटर्नमुळे आतापर्यंत ३० हून अधिक वेळा शून्य बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
* मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने सदैव गजबजलेले दादर विभागानेही अनेक उपाययोजनानंतर कोरोनावर मात केली होती. मात्र सध्या या विभागात ८१ सक्रीय रुग्ण आहेत.
* धारावीत सध्या १६ सक्रिय रुग्ण आहेत. माहीम परिसरात मात्र ७१ सक्रीय रुग्ण आहेत. मात्र शनिवारी माहीम येथे तीन बाधित रुग्ण सापडले आहेत.
जी उत्तर विभागातील आजची स्थिती
परिसर...आजचे रुग्ण..एकूणबाधित..डिस्चार्ज...सक्रिय
दादर.... १०४१०.... १००२६...८१....०९
धारावी...७१५१....६७१८.... १६... ००
माहीम.... १०७०६... १०३७४.... ७१.... ०३