धारावी पुनर्विकासाच्या निविदांना अखेर मुहूर्त
By admin | Published: January 29, 2016 02:19 AM2016-01-29T02:19:26+5:302016-01-29T02:19:26+5:30
धारावीतील झोपडीधारकांना ३५0 चौरस फुटांचे घर देण्याची आणि प्रकल्पाच्या निविदा १९ जानेवारीला काढण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्र्यांनी केली होती. मात्र,
मुंबई : धारावीतील झोपडीधारकांना ३५0 चौरस फुटांचे घर देण्याची आणि प्रकल्पाच्या निविदा १९ जानेवारीला काढण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्र्यांनी केली होती. मात्र,
तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या निविदा काढण्यास डीआरपीला
मुहूर्त मिळाला असून, शनिवार ३0
जानेवारी रोजी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती डीआरपी अधिकाऱ्यांनी दिली.
धारावीकरांना ३00 ऐवजी ३५0 चौरस फुटांचे घर देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार गृहनिर्माणमंत्र्यांनी १९ जानेवारीला निविदा काढण्यात येतील, असे सांगितले होते, परंतु तांत्रिक कारणांमुळे गृहनिर्माणमंत्र्यांनी जाहीर केलेल्या तारखेला निविदा जाहीर करण्यात आल्या नव्हत्या.
अखेर गुरुवारी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मल देशमुख यांनी धारावी पुनर्विकासाच्या निविदा काढण्याची घोषणा केली आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
शनिवारी निविदा जाहीर
होणार असल्या, तरी सेक्टर १
मधील रहिवाशांनी ७५0 चौरस फुटांच्या घरांची मागणी लावून
धरली आहे. या मागणीसाठी
डीआरपी सेक्टर १ रहिवाशी कृती संघाने ३0 आणि ३१ जानेवारी रोजी सह्यांची मोहीम राबविण्याचा
निर्णय घेतला आहे. या
सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना
देण्यात येणार असल्याचे, कृती
संघाचे रिडन फर्नांडो यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)