धारावीतील रहिवाशांचा ‘रास्ता रोको’
By Admin | Published: April 17, 2016 02:08 AM2016-04-17T02:08:23+5:302016-04-17T02:08:23+5:30
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर १ मधील माटुंगा लेबर कँपमधील इमारती आणि चाळीतील रहिवासी, तसेच शाहूनगर, बालिगानगर गीतांजली नगर, आर.पी. नगर आणि रेल्वे
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर १ मधील माटुंगा लेबर कँपमधील इमारती आणि चाळीतील रहिवासी, तसेच शाहूनगर, बालिगानगर गीतांजली नगर, आर.पी. नगर आणि रेल्वे लगतच्या वगळलेल्या झोपडपट्ट्यातील संतप्त शेकडो रहिवाशांनी डीआरपीच्या निषेधार्थ शनिवारी धारावी कुंभारवाडा
येथील बिस्मिला हॉटेल चौकात
‘रस्ता रोको’ केला. ७५० चौरस फुंटाचे घर द्यावे अन्यथा डीआरपीतून आम्हाला वगळण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी
केली.
डीआरपी सेक्टर १ रहिवासी कृती संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनात मोठ्यांसह लहान मुलेही सहभागी झाली होती. रहिवाशांच्या आंदोलनामुळे सायन-धारावी येथील ६० फूट मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती निवळली. आम्हाला ७५० चौरस फुटांचे घर देण्यात यावे अन्यथा आम्हाला डीआरपी प्रकल्पातून वगळण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी या वेळी केली. महत्त्वाचे म्हणजे, मागण्या मान्य होत नाहीत, तोवर डीआरपीची निविदा प्रक्रिया थांबवण्यात यावी, या मागणीसाठी वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)