धारावी नियंत्रणात; दादर-माहिममध्ये रुग्णवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:08 AM2021-09-12T04:08:58+5:302021-09-12T04:08:58+5:30
मुंबई धारावी पॅटर्नमुळे कोरोनाचा प्रसार दाट झोपडपट्टीतही नियंत्रणात ठेवणे महापालिकेला शक्य झाले आहे. मात्र, मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने सतत ...
मुंबई
धारावी पॅटर्नमुळे कोरोनाचा प्रसार दाट झोपडपट्टीतही नियंत्रणात ठेवणे महापालिकेला शक्य झाले आहे. मात्र, मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने सतत गजबजलेले दादर तसेच माहीम परिसरात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. जी उत्तर विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या भागामध्ये आता २१८ सक्रिय रुग्ण आहेत.
मध्यवर्ती ठिकाण आणि मोठी बाजारपेठ असल्यामुळे दादर परिसरात कायम लोकांची गर्दी असते. तर आशिया खंडातील मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान उभे राहिले होते. मात्र, जास्तीत जास्त लोकांची चाचणी, तात्काळ निदान, योग्य उपचार, असे सूत्र अवलंबल्याने जुलै २०२० मध्ये धारावीत कोरोना नियंत्रणात आला आहे.
* आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागाने कोरोनाचा प्रसार कशा प्रकारे रोखता येईल? याचा आदर्श जगापुढे ठेवला. धारावी पॅटर्नमुळे आतापर्यंत १८ वेळा शून्य बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
* दादर विभागानेही अनेक उपाययोजनानंतर कोरोनावर मात केली होती. मात्र, सध्या या विभागात ८२ सक्रिय रुग्ण आहेत.
* धारावीत सध्या १५ सक्रिय रुग्ण असून, माहीम परिसरात मात्र १२१ सक्रिय रुग्ण आहेत. मात्र, शनिवारी माहीम येथे केवळ एक बाधित रुग्ण सापडला आहे.
जी उत्तर विभागातील आजची स्थिती
परिसर...आजचे रुग्ण..एकूण बाधित..डिस्चार्ज...सक्रिय
दादर.... १००९६.... ९७१३...८२....०६
धारावी...७०५०....६६२१.... १५... ०३
माहीम.... १०४४०... १००५८.... १२१.... ०१