Join us

धारावी रोखणार गोवराचा उद्रेक, लसीकरणावर पालिकेचा भर; जनजागृती मोहीमही घेतली हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 10:52 AM

८६८ गोवर विरोधी लसीकरणाकरिता पात्र लाभार्थी मुलांचे १० दिवसांत लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रातील नियमित लसीकरण सत्रांसोबत अतिरिक्त लसीकरण सत्रे झोपडपट्टीत भरविले जात आहे. 

मुंबई: धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये गोवरचा उद्रेक होऊ नये म्हणून महापालिका सज्ज झाली आहे. त्यानुसार, महापालिकेचा जी-उत्तर विभाग वेगाने काम करत असून, एकूण लोकसंख्येमधील शून्य ते कोणत्याही वयोगटातील कोणतीही व्यक्ती जिला ताप आला आहे वा अंगावर पुरळ आली आहे, त्यांची माहिती आणि ० ते ५ वयोगटातील गोवर व गोवर रुबेला लसीकरणासाठी पात्र लाभार्थी शोधून त्यांचे लसीकरण करणे, या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. दरम्यान,  रविवारी २३ लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.झोपडपट्टीत लसीकरण  ८६८ गोवर विरोधी लसीकरणाकरिता पात्र लाभार्थी मुलांचे १० दिवसांत लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रातील नियमित लसीकरण सत्रांसोबत अतिरिक्त लसीकरण सत्रे झोपडपट्टीत भरविले जात आहे. 

कोणीही सुटणार नाहीआजपर्यंत एकूण ११९ शिबिरांचे आयोजन करण्यात आले. १० दिवसांत ५० लसीकरण शिबिरे आयोजित केली जातील. कोणतेही ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतचे बालक लसीकरणातून सुटणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. 

सर्वेक्षणात आजमितीपर्यंत काय ?-     २ लाख १५ हजार ६२८ लोकसंख्येचे सर्वेक्षण -     यामध्ये एकूण ताप व पुरळ याचे ५९ रुग्ण शोधण्यात आले.-  त्यांना अ जीवनसत्वाची मात्रा देण्यात आली.-     संबंधित रुग्णांचे रक्तनमुने गोवरचे निदान करण्याकरिता पाठविण्यात आले.-     त्यामध्ये ५ गोवर रुग्ण आढळून आहे.-     सध्या सर्व रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. 

बॅनर्स लावले --     गोवरबाबतचे बॅनर्स लावण्यात आले.- आरोग्य सेविका तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या दत्तक वस्ती योजनेतील कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी माहितीपत्रके वाटण्यात येत आहेत. आजतागायात १५ हजार माहितीपत्रके वाटण्यात आली. रुग्ण कळवा -४५० खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना संशयित रुग्णांची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मोहिमेत सहभाग२६८ अंगणवाड्या, ६९ शाळांशी समन्वय साधून त्यांना मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.

काय आहे उद्दिष्ट ?१४ नोव्हेंबरपासून घरोघरी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाचा वेग वाढविण्यात येणार आहे. लोकसंख्येचे सर्वेक्षण १० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

वॉर रूमकोरोना वॉर रूमचा उपयोग गोवर आजाराबाबतची माहिती, लसीकरणाची माहिती, रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्याची गरज असल्यास त्यांना रुग्णालयाशी संपर्क साधून दिला जाणार आहे. रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका