धारावीत ५ हजारांंच्या कॅश बॅकसाठी तरुणाला मोजावे लागले ५५ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:15+5:302021-06-17T04:06:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : धारावीतील तरुणाला ‘फोन पे’वर आलेल्या ५ हजारांंच्या कॅश बॅकसाठी ९५ हजार रुपये मोजावे लागले. ...

In Dharavi, a young man had to pay Rs 55,000 for a cash back of Rs 5,000 | धारावीत ५ हजारांंच्या कॅश बॅकसाठी तरुणाला मोजावे लागले ५५ हजार

धारावीत ५ हजारांंच्या कॅश बॅकसाठी तरुणाला मोजावे लागले ५५ हजार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : धारावीतील तरुणाला ‘फोन पे’वर आलेल्या ५ हजारांंच्या कॅश बॅकसाठी ९५ हजार रुपये मोजावे लागले. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारावीत राहणारा आसिफ शेख (३०) या तरुणाचा गारमेंटचा व्यवसाय आहे. मंगळवाऱी दुकानात असताना, अनोळखी व्यक्तीने कॉल करून ‘फोन पे’मधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच ‘फोन पे’वर ४ हजार ९९९ रुपयांचे कॅश बॅक आले असून, ते तुम्हाला हवे आहे का? अशी विचारणा केली. त्यांनी होकार देताच, मोबाईलवर नोटिफिकेशन आले. त्याखालील लिंकवर क्लिक करताच शेख याच्या खात्यातून एकूण ९५ हजार रुपयांचे व्यवहार झाले. त्यानंतर संबंधित क्रमांकावर त्याने संपर्क साधला असता, ताे बंद हाेता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्याने धारावी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

...............................

Web Title: In Dharavi, a young man had to pay Rs 55,000 for a cash back of Rs 5,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.