Join us  

धारावीकरांना धारावीतच जागा देणार : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 9:00 AM

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील धारावीकरांना आणि धारावीतील व्यावसायिकांना धारावीतच जागा दिली जाणार

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील धारावीकरांना आणि धारावीतील व्यावसायिकांना धारावीतच जागा दिली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना दिली.

विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, गेल्या दोन वर्षांत महायुती सरकारनं केलेल्या जनकल्याणाच्या कामाची जनतेने दखल घेतली असून याच सरकारला जनता पुन्हा एकदा संधी देईल. पंतप्रधानांच्या लोकसभा प्रचारासाठी मुंबई पालिकेने ३७कोटींचा खर्च केला हे साफ चुकीचे आहे, असे झालेले नाही. त्याचबरोबर पालिकेच्या साहाय्यक आयुक्तांकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे कोणाचेही प्रमोशन डावलले गेले नाही. मुंबईत रस्ते घोटाळा झाला नाही. पाच कंत्राटदारांना अटी, शर्टी पूर्ण केल्यानंतरच कंत्राट दिले गेले. महापालिकेत प्रशासक हा हुकुमशाही, एकाधिकारशाहीपणे वागत आहे, हे चुकीचे आहे. निवडणुका या निवडणूक आयोग घेतो. त्यामुळे आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्याव्यात, ते आयोग ठरवेल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे काम वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीसविधानसभा