मुंबई - वरळी पाठोपाठ धारावी परिसरातही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने या परिसरातील मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे. तर सहा नवीन रुग्णांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या परिसरात पालिकेची विशेष पथके बाधित क्षेत्रातील लोकांची तपासणी करीत आहे. दाटीवाटीने वसलेल्या या देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत प्रभावी क्वारंटाईन शक्य नसल्याने संशयित व्यक्तींची व्यवस्था अन्य ठिकाणी केली जात आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या सोशल नगर, मदिना नगर, शास्त्री नगर, जनता नगर अशा परिसरामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या क्षेत्रांमध्ये जाऊन पालिकेचे विशेष पथक तेथील लोकांची तपासणी करीत आहेत. यापैकी ताप, सर्दी, खोकला असलेल्या नागरिकांना पुढील तपासणीसाठी साई रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.
मात्र रविवारी या परिसरात १५ नवीन रुग्ण आढळून आले होते. यामध्ये गेल्या दोन दिवसांत आणखी १२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यापैकी नेहरू नगरमध्ये राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचा सायन रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर इंदिरा नगर येथून ६० वर्षीय पुरुष, जनता को आॅप सो. येथून ५० वर्षीय आणि गुलमोहर चाळीतील ३४ वर्षीय महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ५१ वर्षीय व्यक्ती आणि ब्रिच कँडी रुग्णालयातील २१ वर्षीय वैद्यकीय कर्मचाºयाचा समवेश आहे. मंगळवारी आणखी सहा रुग्ण वाढले आहेत.कोरोनाचे रुग्ण...डॉ. बालिगा नगर - पाच रुग्ण (दोन मृत्यू)वैभव इमारत, धारावी मुख्य रस्ता-दोन रुग्णमकुंद नगर झोपडपट्टी - नऊ रुग्णमदिना नगर ...दोन रुग्णधनवडा चाळ - एक रुग्णमुस्लिम नगर - सात रुग्ण (एकाचा मृत्यू)सोशल नगर - सहा रुग्ण (एकाचा मृत्यू)जनता सोसायटी . सात रुग्णकल्याण वाडी - चार रुग्ण (दोन मृत्यू)पी एम जी पी कॉलनी ....एक रुग्णमुर्गुन चाळ... दोन रुग्णराजीव गांधी चाळ... दोन रुग्णशास्त्री नगर - चार रुग्णनेहरू चाळ (एक मृत्यू)इंदिरा चाळ - एक रुग्णगुलमोहर चाळ - एक रुग्णविभाग रुग्ण मृत्यू क्वारंटाईनपॉझिटिव्हधारावी ५५ ०७ १८दादर १९ ०० १२माहीम ०६ ०१ ०१एकूण ८० ०८ ३१