धारावीत आतापर्यंत १०१ रुग्ण, १० मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:33 AM2020-04-18T00:33:29+5:302020-04-18T00:33:42+5:30

ताप, सर्दी, खोकला असलेल्या नागरिकांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. यापैकी संशयित लोकांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात येत आहे.

Dharawati so far 101 patients, 3 deaths | धारावीत आतापर्यंत १०१ रुग्ण, १० मृत्यू

धारावीत आतापर्यंत १०१ रुग्ण, १० मृत्यू

Next

मुंबई : एकीकडे वरळीत कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात येत असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत असताना धारावी परिसराने शंभरी पार केली आहे. देशातील या सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये गेल्या २४ तासांत १५ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
धारावी परिसरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महापालिकेने येथे आरोग्य शिबिर सुरू केले आहे. येथील बाधित क्षेत्रातील लोकांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक तैनात ठेवण्यात आले आहे. अशी दहा पथके असून प्रत्येकी दोन डॉक्टरांचे पथक बाधित क्षेत्रातील घरोघरी फिरून नागरिकांना तपासत आहेत. यापैकी ताप, सर्दी, खोकला असलेल्या नागरिकांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. यापैकी संशयित लोकांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात येत आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा शोध लगेच लागत असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. आतापर्यंत या परिसरातील दहा लोकांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत मुस्लिम नगर, माटुंगा लेबर कॅम्प, लक्ष्मी चाळ, जनता सोसायटी, सोशल नागर, सर्वोदय सोसायटीमध्ये १५ नवीन रुग्ण सापडले आहेत.

१०१ रुग्ण - १० मृत्यू
डॉ. बालिगा नगर - ५ रुग्ण (3 मृत्यू) । वैभव इमारत, धारावी मुख्य रस्ता - २ रुग्ण । मकुंद नगर झोपडपट्टी - १८ रुग्ण । मदिना नगर - २ रुग्ण । धनवडा चाळ - १ रुग्ण । मुस्लिम नगर - २१ रुग्ण (एकाचा मृत्यू) । सोशल नगर - १० रुग्ण (एकाचा मृत्यू) । जनता सोसायटी - ९ रुग्ण । कल्याण वाडी - ४ रुग्ण (२ मृत्यू) । पी एम जी पी कॉलनी - एक रुग्ण। मुर्गुन चाळ - २ रुग्ण । राजीव गांधी चाळ - ४ रुग्ण। शास्त्री नगर - ४ रुग्ण। नेहरू नगर (एक मृत्यू) । इंदिरा चाळ - ४ रुग्ण । गुलमोहर चाळ - १ रुग्ण । साई राज नगर - १ रुग्ण
। ट्रान्झिस्ट कॅम्प - एक रुग्ण । रामजी चाळ - १ रुग्ण । सूर्योदय सोसायटी - २ रुग्ण । शिवशक्ती नगर - एक रुग्ण । लक्ष्मी चाळ एक रुग्ण । माटुंगा लेबर कॅम्प - ४ रुग्ण (२ मृत्यू)

Web Title: Dharawati so far 101 patients, 3 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.