'निघाले उद्धव अयोध्येला', प्रभू श्रीरामांच्या दर्शनसाठी ठाकरेंचा पुन्हा एकदा युपी दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 10:20 PM2019-06-05T22:20:53+5:302019-06-05T22:20:57+5:30
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहेत. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला पुढील महिन्यात भेट देणार आहेत, असे शिवसेनेच्या माध्यम कक्षाकडून सांगण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी, राम मंदिराच्या बांधकामाचा मुद्दा उचलत उद्धव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं.
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत. याबाबत निश्चित तारीख सांगण्यात आली नाही. मात्र, पुढील महिन्यात हा दौरा असल्याचे समजते. ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी, राम मंदिरासाठी सरकारने अध्यादेश काढावा, त्यास शिवसेनेचा पाठींबा असेल, असे म्हटले होते. तसेच, राम मंदिर बांधण्याची तारीख आम्हाला हवी आहे, आम्हाला राम मंदिराच्या उभारणीची तारीख कळवा, नंतरच इतर विषयांवर बोलू, असे म्हणत उद्धव यांनी युतीचा मुद्दाही लांबणीवर ढकलला होता. मात्र, निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत युती केली. तर, लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला मोठं यशही मिळालं आहे. त्यामध्ये शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळाला आहे.
Uddhav Thackeray to visit Ayodhya later this month
— ANI Digital (@ani_digital) June 5, 2019
Read @ANI Story | https://t.co/UUwoe90eqipic.twitter.com/Py9CDT1Eti