"फसवणूक नको आरक्षण हवं", धीरज देशमुख यांचे लक्षवेधी जॅकेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 01:18 PM2024-02-20T13:18:02+5:302024-02-20T13:20:00+5:30
Dhiraj Deshmukh : मराठा समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून हा पोशाख घातला आहे, असे यावेळी धीरज देशमुख म्हणाले.
Dhiraj Deshmukh (Marathi News) : मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या विशेष अधिवेशनाआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या आहवालाला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार, राज्यात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान 'फसवणूक नको आरक्षण हवं' असे लिहिलेल्या काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांच्या जॅकेटची चर्चा झाली. यावेळी आमची सरकारकडे मागणी आहे की, मनोज जरांगे जे मुद्दे मांडत आहेत ते विचारात घ्यावेत. जरांगे पाटील यांच्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ज्यांचे कुणबी दाखले सापडले आहेत, त्यांचे काय होणार? फक्त निवडणुकीच्या काळात सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे, परत मराठा समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून हा पोशाख घातला आहे, असे यावेळी धीरज देशमुख म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज महाराष्ट्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आजच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत आपली काय भूमिका असावी, कोणते मुद्दे मांडायचे आणि कोणत्या नेत्यांने कोणत्या मुद्द्यावर बोलायचे, याबाबतीत या बैठकीत चर्चा होत झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषण झाले. या अभिभाषणात राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद ते अर्थव्यवस्थेची उन्नती अशा सगळ्याच विषयावर सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. तसेच, या अधिवेशनात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण मिळणार, हे निश्चित झाले आहे.