Join us  

Dhirendra Shastri in Mumbai: धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत; भाजप आमदाराने मोठा दरबार भरविला, मनसे, काँग्रेसचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 9:33 AM

धीरेंद्र शास्त्री हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले आहेत. यामुळे मीरारोडमध्ये त्यांच्या कार्यक्रमाला विरोध होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावरून महाराष्ट्रात वाद सुरु आहे. अशातच भाजपाच्या आमदाराने धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन मीरारोड येथे केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. धीरेंद्र शास्त्री आज मीरारोडला येत आहेत. यामुळे येथील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. 

धीरेंद्र शास्त्री हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले आहेत. यामुळे मीरारोडमध्ये त्यांच्या कार्यक्रमाला विरोध होत आहे. अंनिसने पोलिसांत तक्रार केली आहे. तर मनसेने देखील या कार्यक्रमाला विरोध करून रोखण्याची मागणी केली आहे. भाजपा आमदार गीता जैन, जिल्हाध्यक्ष रवि व्यास, कोषाध्यक्ष सुरेश खंडेलवाल यांनी शनिवारी आणि रविवारी दोन दिवस धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जवळपास ७ एकरावर यासाठी तयारी करण्यात आली आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील या कार्यक्रमाचा विरोध केला आहे. मीरा-भाई मनसे नेता संदीप राणे यांनीही हा कार्यक्रम रोखण्याची मागणी केली आहे. धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या विश्वासाचे प्रतिनिधित्व करतात, असे गीता जैन म्हणाल्या आहेत. 

मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड भाईंदर येथील एसके स्टोन चौकीजवळील सेंट्रल पार्क मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. बागेश्वर धाम सरकारच्या दरबारात सायंकाळी 5 ते 9 या वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ५० हजार ते १ लाख भाविक येण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. 

टॅग्स :बागेश्वर धामभाजपा