मुंबई : हुंडाबळीविरुद्ध कारवाई करणा-या पोलिसाकडूनच हुंड्यासाठी २२ वर्षीय पत्नीचा मानसिक, शारिरीक छळ केल्याची धक्कादायक घटना पवईत उघडकीस आली आहे. किरण नगराज पवार (३०) असे पोलिसाचे नाव आहे. तो धुळ्यातील शिरपूर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. विवाहितेने शिरपूर पोलीस ठाण्यातही मदत मागितली. मात्र तेथील पोलिसांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. अखेर तिने मुंबई गाठून याप्रकरणी तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरुन तीन महिन्यानंतर पवई पोलिसांनी पोलीस कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला.मरोळ पोलीस वसाहतीत २२ वर्षीय नेहा (नावात बदल) कुटुंबियासोबत राहते. तिचे वडील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात धुळे जिल्ह्यातील पोलीस शिपाई पवार सोबत तिचा विवाह झाला. लग्नात वडीलांनी लग्नाचा खर्च म्हणून दिड लाख रुपये दिले. तसेच २६ गॅ्रमचे दागिने दिले. लग्नाच्या तिसºया दिवशी पती आणि सासूमध्ये किरकोळ वाद झाला. त्याच दरम्यान नेहाने सासूचे जेवणाचे ताट उचलले म्हणून पतीने तिला मारहाण सुरु केली. तेथूनच तिच्यावर अत्याचार सुरु झाले. काही दिवसाने सासूने जेवणावरुन टोमणे मारत महिनाभरातच तिला घराबाहेर काढले. कुटुंबियांनी नेहाकडे धाव घेत तिला माहेरी आणले. पुढे काही महिने गेल्यानंतर जून महिन्यात सासरच्या मंडळीच्या विनंतीनंतर नेहा पुन्हा सासरी गेली. ती पतीसोबत शिर्डीला गेली. तेथे पवारने मद्यपान करुन नेहाला मारहाण केली. आणि तिला पुन्हा माहेरी सोडून निघून गेला.
एवढे होऊनही मुलीचा संसारासाठी कुटुंबियांकडून धडपड सुरु होती. अखेर आॅगस्ट महिन्यात नेहाला त्रास देणार नाही, या अटीवर पवारने तिला घरी आणले. आठवड्याभरानंतर तिला माहेराहून महागड्या वस्तू आणण्यावरुन मारहाण सुरु झाली. मात्र तिने कुटुंबियांना याबाबत सांगितले नाही. नेहाकडील दागिने पवारने जुगारामध्ये विकले. नेहाच्या कुटुंबियांकडून पैसे घेणे सुरु ठेवले. तर दुसरीकडे वेगवेगळी कारणे सांगून नेहाच्या कुटुंबियांकडून पैसे उकळणे सुरु होते. पवारने गाडी घेण्यासाठी पैसे आणण्यास सांगितले. नेहाने नकार दिला म्हणून तिला मारझोड करुन तिला घराबाहेर काढले. शिरपूर पोलिसांचा अजब सल्लाआॅक्टोंबर महिन्यात नेहावर सुरु असलेल्या अत्याचाराबाबत कुटुंबियांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. तेव्हा शिरपूर पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता, मुलीला काही दिवस माहेरी घेउन जाण्याचा सल्ला दिला. पोलीस मध्यस्थी घेतील, म्हणून ते मुलईला घेऊन आले. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांकडून काहीच प्रतिसाद आला नाही. तीन महिन्यानंतर गुन्हा दाखलनेहाने २९ डिसेंबर रोजी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पवई पोलिसांनी तब्बल तीन महिन्यानंतर शनिवारी पवारसह त्याच्या कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला.