ऑनलाईन शिक्षणात 'झूम' ची धूम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 05:05 PM2020-11-03T17:05:14+5:302020-11-03T17:05:42+5:30

Education News : राज्यातील ५७ टक्के विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन शिक्षणासाठी झूमचा वापर

Dhoom of 'Zoom' in online education | ऑनलाईन शिक्षणात 'झूम' ची धूम

ऑनलाईन शिक्षणात 'झूम' ची धूम

Next

त्या खालोखाल गुगल मीट आणि व्हॅट्सऍपवरून विद्यार्थी घेतात धडे

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शाळा व शैक्षणिक संस्था सद्यस्थितीत विद्यार्थ्यांसाठी बंदच ठेवून ऑनलाईन शिक्षणालाचशिक्षण विभागाकडून प्राधान्य देण्यात आले आहे. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षकांकडून या ऑनलाईन शिक्षणासाठी विविध माध्यमांचा वापर होत असला तरी झूम एप्लिकेशनने या सगळ्यात बाजी मारली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी झूम एप्लिकेशनचा सगळ्यात जास्त वापर होत असून त्या खालोखाल गुगल मीट आणि व्हाट्सअपचा वापर होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. शाळांच्या ऑनलाईन तासिका, प्रशिक्षण वर्ग, खाजगी क्लासेसच्या तासिका यासाठी झूमचा वापर विद्यार्थी, शिक्षक करत आहेत.

कुर्ला येथील गांधी बालमंदिर माध्यमिक शाळेचे शिक्षक आणि समुपदेशक म्हणून कार्यरत असणारे जयवंत कुलकर्णी यांनी राज्याच्या मुंबई, ठाणे गडचिरोली , कोल्हापूर, सातारा , सांगली, रत्नागिरी आणि काही महत्त्वाच्या जिल्ह्यातून विद्यार्थी पालकांचे सध्याच्या ऑनलाईन शिक्षणावरील प्रश्नाच्या सहाय्याने सर्वेक्षण केले. यामध्ये २५०० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणामध्ये आपली मते आणि प्रतिक्रिया नोंदविल्या. दरम्यान ५७. ६ टक्के विद्यार्थी ओनलाईन शिक्षणासाठी झूमचा वापर करत आहेत. झूम वर एकाच वेळी होणाऱ्या ऑनलाईन तासिकेच्या वर्गात अनेक विद्यार्थ्यांना सामावून घेता येते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे सोपे होते यामुळे ऑनलाईन तासिकांसाठी झूमची निवड जास्त केली जाते. सोबतच एका झूम मीटिंगला ४० मिनिटांची मर्यादा असल्याने ती ऑनलाईन तासिकेसाठी ठरवून दिलेल्या निर्देशाना ही सुसंगत ठरते आणि तुलनेने डेटा खर्च ही कमी येतो. या कारणास्तव ऑनलाईन शिक्षणासाठी झूम एपचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो.  झूम खालोखाल २३. ७ टक्के विद्यार्थी गुगल मीट वापरत असल्याचे समोर आले आहे. ११. ४ टक्के विद्यार्थी व्हाट्सअपद्वारे अभ्यास करत असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच एखाद्या ऑनलाईन तासिकेला उपस्थित राहता आले नाही किंवा ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होत नसल्यास शिक्षकांनी पुरविलेल्या व्हाट्सअप वरील अभ्यासक्रम, पीडीएफ स्वरूपातील प्रश्नोत्तरे यांची मदत घेऊन अभ्यास करतात.

इतर माध्यमांचा विचार करता विद्यार्थी युट्युबचा वापर ही ऑनलाईन शिक्षणासाठी करत असून ते वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७,. ५० % आहे. मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून २. ३ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेतात. २ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणासाठी जिओ मीटचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.  टीव्हीनंतर व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर गेमच्या रुपाने टेक्नॉलॉजीने विद्यार्थ्यांना विळख्यात घेतले होते. मात्र आता ऑनलाईन शिक्षणासाठी इतक्या विविध साधनांचा वापर करताना विद्यार्थ्यांना या विळख्यातून बाहेर कसे काढायचे हा प्रश्न पालकांपुढे उभा राहिला आहे.

Web Title: Dhoom of 'Zoom' in online education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.