धुळवडीनिमित्त मुंबईत ४ हजार ६१२ वाहनचालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:14 AM2020-03-11T01:14:07+5:302020-03-11T01:14:20+5:30

मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त : तळीरामांसह, विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांच्या संख्येत घट

Dhulwadi action against 4 thousand 612 drivers in Mumbai | धुळवडीनिमित्त मुंबईत ४ हजार ६१२ वाहनचालकांवर कारवाई

धुळवडीनिमित्त मुंबईत ४ हजार ६१२ वाहनचालकांवर कारवाई

Next

मुंबई : होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी मुंबईत तब्बल ५ हजार ३९६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात, दारूच्या नशेत गाड्या चालविणाºया तब्बल ४८६ मद्यपी वाहनचालकांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तळीरामांसह विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांच्या संख्येत घट झालेली दिसून आली. त्यात, मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला दिसून आलेला नाही.

मोठ्या उत्साहात साजºया केल्या जाणाºया होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी या सणाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी शहरात जागोजागी नाकाबंदी करीत विशेष बंदोबस्त ठेवला. तसेच सीसीटीव्ही कॅमेºयांच्या साहाय्याने संपूर्ण शहरावर करडी नजर ठेवली आहे. रंगाचा भंग होऊ नये म्हणून होळीच्या सणांदरम्यान रंग आणि गुलाल उधळण्यासोबत रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे, पिशव्या फेकणे, अपशब्द, वाक्य, गाणे, स्लोगन, चित्र, सिम्बॉल्स यांच्यावर या काळात बंदीचे आदेश लागू केले आहेत. मुंबई पोलिसांनी ४० हजार पोलिसांचा फौजफाटा सोमवारी आणि मंगळवारी तैनात ठेवला होता. सोबतच सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथके, जलद प्रतिसाद पथके, बॉम्ब शोधक व नाशक पथके आणि वाहतूक पोलीस कर्तव्य बजावत होते. मुंबईतील गर्दीची ठिकाणे, मॉल्स, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि चौपाट्यांवर नजर होती.

नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी तब्बल ५ हजार ३९६ वाहनचालकांवर कारवाई केली. यात विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºया सर्वाधिक ३ हजार २५ दुचाकीस्वारांसह भरधाव वेगाने वाहन चालविणाºया १ हजार ४७१ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. दारूच्या नशेत वाहन चालविणाºया ४८६ वाहनचालक व ३४१ ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाई केली. रात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी मुंबई पोलिसांनी जाहीर केली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत तळीरामांसह, विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºयांच्या संख्येत घट दिसून आली. गेल्या वर्षी भरधाव वेगाने वाहन चालविल्याप्रकरणी ३४५, निष्काळजीपणे धोकादायकरीत्या वाहन चालविल्याप्रकरणी १६२, ट्रिपल सीट वाहन चालविल्याप्रकरणी ६८०, विनाहेल्मेट वाहन चालविल्याप्रकरणी ४ हजार ५९५ आणि अन्य कायद्यांचे भंग केल्याप्रकरणी २ हजार ९४८ वाहनचालकांवर कारवाई केली.

३१ जण रुग्णालयात दाखल
कोरोनाचे सावट असतानाही मुंबईत रंगपंचमीचा दिवस उत्साहात साजरा झाला. मात्र रंगाचा बेरंग होऊन केईएम , सायन आणि नायर रुग्णालयात एकूण ३१ जणांना मंगळवारी दाखल करण्यात आले. याना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. केईएम रुग्णालायात एकूण ९ रुग्ण दाखल करण्यात आले होते तर सायन रुग्णालयात सायन रुग्णालायत १६ आणि नायर रुग्णालयात ६ रुग्णांना दाखल केले होते.

Web Title: Dhulwadi action against 4 thousand 612 drivers in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी