स्नेहा मोरे
मुंबई : गेल्या पाच वर्षांत राज्यातील मधुमेह रुग्णांचे प्रमाण १६० टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. २०१४-१५ साली मधुमेहाचे ६२ हजार ९२ रुग्ण होते, मात्र २०१८-१९ वर्षांत ही संख्या १, ६२,०१० वर पोहोचली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात मधुमेहाच्या तपासणी व निदानाचे प्रमाण वाढल्याने हे चित्र समोर आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील संसर्गजन्य आजारांपेक्षा जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या असंसर्गजन्य आजारांचा विळखा जगभर वाढत आहे. जागतिक स्तरावर टाईप २ मधुमेह रुग्ण देशात सर्वाधिक आहेत. घरोघरी करण्यात येणाºया तपासण्यांमुळे मधुमेहाचे लवकर निदान होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे यांनी सांगितले की, २०१८-१९ कालावधीत मुंबई, पुणे आणि नागपूर अशा मेट्रो शहरांप्रमाणेच अन्य ठिकाणी एक कोटींहून अधिक व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान ग्रामीण भागात मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळले. मुंबईतील मधुमेह रुग्णांचे प्रमाण १४ टक्के इतके असून यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे.मधुमेहावर नियंत्रण मिळविणे शक्यस्थूल व्यक्ती, बैठे काम करणाºया व्यक्ती किंवा व्यायाम न करणाºया व्यक्तींना, तसेच आनुवंशिकतेनेही मधुमेह होऊ शकतो. रक्तदाब असलेल्या व्यक्ती, ज्या व्यक्तींच्या रक्तातील ‘ट्रायग्लिसराइड’चे प्रमाण १५० पेक्षा जास्त आणि एचडीएल कोलेस्टेरोल ४० पेक्षा कमी असते, अशा व्यक्ती, ज्या स्त्रियांना ‘पीसीओएस’ असतो किंवा ज्यांना गरोदरपणातील मधुमेह असतो अशांनाही मधुमेहाची शक्यता जास्त असते. मधुमेहाचे निदान झाल्यावर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आहारनियमन करून घ्यावे.१० वर्षांत मधुमेहाचे प्रमाण तिशीच्या मुला-मुलींमध्येही दिसत आहे. बदलती जीवनशैली, आहारपद्धती, निद्रानाश आणि व्यायाम-योगाचा अभाव यांचा परिणाम होत आहे. मधुमेहामुळे मूत्रपिंडाचे विकार, दृष्टीहिनता, हृदयविकार, पक्षाघात या आजारांचा धोका संभावतो. उच्चवर्गीयांमध्ये मधुमेह अधिक दिसून येतो, असा गैरसमज आहे, मात्र कनिष्ठ व मध्यमवर्गीय घटकांचेही यात प्रमाण अधिक आहे.- डॉ. मनीष मोटवानी, मधुमेहतज्ज्ञराज्याची आकडेवारी वर्ष रुग्णसंख्या२०१४-१५ ६२ हजार २९२०१५-१६ ८४ हजार ८४९२०१७-१८ १ लाख २७ हजार १९९२०१८-१९ १ लाख ६२ हजार १०