राज्यात बुधवारी १५ हजार १६९ रुग्णांचे निदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:06 AM2021-06-03T04:06:30+5:302021-06-03T04:06:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरते आहे. राज्यात बुधवारी १५ हजार १६९ रुग्णांचे निदान ...

Diagnosis of 15 thousand 169 patients in the state on Wednesday | राज्यात बुधवारी १५ हजार १६९ रुग्णांचे निदान

राज्यात बुधवारी १५ हजार १६९ रुग्णांचे निदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरते आहे. राज्यात बुधवारी १५ हजार १६९ रुग्णांचे निदान झाले, तर दुसरीकडे मृत्यूंची संख्याही कमी होताना दिसते आहे, दिवसभरात २८५ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,७६,१८४ झाली असून, मृतांचा आकडा ९६ हजार ७५१ आहे.

राज्यात दिवसभरात २९,२७० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५४,६०,५८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात २,१६,०१६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५५,१४,५९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.२६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १६,८७,६४३ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत, तर ७,४१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

बुधवारी नोंद झालेल्या एकूण २८५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या २८५ मृत्यूंमध्ये मुंबई ३१, ठाणे २, नवी मुंबई मनपा २, कल्याण डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा ३, पालघर २, वसई विरार मनपा ३, रायगड ४, पनवेल मनपा १, नाशिक १३, नाशिक मनपा ९, मालेगाव मनपा १, अहमदनगर २१, अहमदनगर मनपा ७, जळगाव २, जळगाव मनपा १, पुणे ११, पुणे मनपा ८, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर १५, सोलापूर मनपा २, सातारा १०, कोल्हापूर २५, कोल्हापूर मनपा ५, सांगली १३, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग ११, रत्नागिरी ११, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा १०, परभणी ३, लातूर ४, लातूर मनपा १, उस्मानाबाद ८, बीड ११, नांदेड २, अकोला ३, अकोला मनपा १, अमरावती ३, यवतमाळ ४, वाशिम १, नागपूर १, नागपूर मनपा १, वर्धा ३, गोंदिया ४, चंद्रपूर १, गडचिरोली ३ इत्यादी रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Diagnosis of 15 thousand 169 patients in the state on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.