लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत काेराेनामुक्त झालेल्यांचे प्रमाण ९३ टक्क्यांवर, तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३३२ दिवसांवर पोहोचला. आतापर्यंत २ लाख ६४ हजार ८५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मंगळवारी दिवसभरात ५२१ रुग्णांचे निदान झाले असून ७ मृत्यूंची नाेंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या २ लाख ८५ हजार ५८० झाली असून मृतांचा आकडा १०,९९५ झाला. सध्या १४,०९६ सक्रिय रुग्ण आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ७ मृतांपैकी ४ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ४ रुग्ण पुरुष व ३ रुग्ण महिला होत्या. शहर-उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात ४०१ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ४ हजार ६८५ आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २ हजार ५८३ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.