लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ५३६ कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर आता ०.२१ टक्के एवढा झाला आहे. दिवसभरात ४६३ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ९३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ११,०६८ एवढा झाला आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ३६३ दिवसांवर पाेहाेचला आहे.
महापालिकेच्या अहवालानुसार, सध्या आठ हजार २७९ सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत दोन ७० हजार १३५ रुग्ण काेराेनामुक्त झाले. शुक्रवारी काेराेनामुळे जीव गमवाव्या लागलेल्या १२ कोरोना रुग्णांपैकी दहा रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्युंपैकी आठ रुग्ण पुरुष आणि चार महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी नऊ जणांचे वय ६० वर्षांवर, तर उर्वरित तीन रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते. आतापर्यंत एकूण दोन लाख ९० हजार ३३६ बाधितांची नाेंद झाली असून, २२ लाख ९२ हजार ३५९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
...........................